पत्रकार संघ बारामती च्या वतीने पत्रकार दिन उत्साहात साजरा
बाळशास्त्रींनी 6 जानेवारी 1832 रोजी 'दर्पण' वृत्तपत्र सुरू केले.
पत्रकार संघ बारामती च्या वतीने पत्रकार दिन उत्साहात साजरा
बाळशास्त्रींनी 6 जानेवारी 1832 रोजी ‘दर्पण’ वृत्तपत्र सुरू केले.
बारामती वार्तापत्र
दरवर्षी 6 जानेवारी रोजी मराठी पत्रकार दिन साजरा केला जातो. या दिवसाला दर्पण दिवस असे देखील म्हटले जाते.
मराठी वृत्तपत्राचे जनक आणि आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी या दिवशी मराठीतील सर्वात पहिले वृत्तपत्र ‘दर्पण’ नावाने प्रकाशित केले होते. बाळशास्त्रींनी 6 जानेवारी 1832 रोजी ‘दर्पण’ वृत्तपत्र सुरू केले. येथूनच मराठी पत्रकारीतेची पायाभरणी झाली आज रोजी मराठीतून शेकडो वृत्तपत्रे प्रकाशित होत आहेत. त्यामुळे आजचा दिवस मराठी पत्रकार दिन म्हणून महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या निमित्ताने पत्रकार संघ बारामती यांच्या वतीने दर्पण कार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेच पूजन अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादर, उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकारी प्रज्ञा ओंबासे, प्रियांका सस्ते यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी बारामतीतील साप्ताहिक रणसिंग चे संपादक अविनाश रणसिंग, लोकसत्ताचे वार्ताहर सुधीर जन्नू, आजतक चे वार्ताहर वसंत मोरे यांचा शाल, सन्मान चिन्ह पुष्प व उपस्थित पत्रकारांचा पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी गणेश बिरादर व वैभव नावडकर यांनी मार्गदर्शन केले पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी पत्रकार संघ, बारामतीचे अध्यक्ष डॉ विजयकुमार भिसे, सचिव तैनूर शेख, खजिनदार सोमनाथ कवडे, उपाध्यक्ष नवनाथ बोरकर,सह खजिनदार दीपक पडकर, यासह राजेश वाघ, अमोल तोरणे,मन्सूर शेख,अमोल यादव,संजय भिसे,प्रशांत तुपे, सागर (ऊर्फ धनु) सस्ते, निलेश जाधव, सूरज देवकाते,उपस्थित होते.
प्रास्तविक डॉ विजय भिसे यांनी केले तर आभार नवनाथ बोरकर यांनी व्यक्त केले तैनूर शेख यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले यावेळी उपमाहीती कार्यालयाचे माहिती सहायक संदीप राठोड, मनीषा लकडे,यांसह पत्रकार व कर्मचारी उपस्थित होते.