पत्रकार सुरेश मिसाळ यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन
पत्रकारिता क्षेत्रावर शोककळा
पत्रकार सुरेश मिसाळ यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन
पत्रकारिता क्षेत्रावर शोककळा
इंदापूर प्रतिनिधी –
इंदापुरातील धडाडीचे पत्रकार सुरेश मिसाळ (वय 40 वर्षे) यांचे शुक्रवारी (दि.8) रात्री हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगी,तीन भाऊ,वहिनी, व बहीण असा परिवार आहे. सुरेश मिसाळ यांना काल दुपारपासूनच अस्वस्थ वाटत होते. त्यानंतर त्रास वाढल्यामुळे त्यांना अकलूज येथील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. तथापि, उपचारादरम्यान रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अकस्मात निधनाचे वृत्त सर्वत्र वाऱ्यासारखे पसरले आणि पत्रकारिता क्षेत्रावर शोककळा पसरली. त्यांच्या अकाली निधनाचा सर्वांनाच मोठा धक्का बसला.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील,दत्तात्रय भरणे,प्रवीण माने,मुकुंद शहा,शिवाजीराव मखरे,बाळासाहेब सरवदे,संदिपान कडवळे, तानाजी धोत्रे,शेखर पाटील,रमेश शिंदे,कृष्णाजी ताटे,माऊली चवरे, इ. राजकीय मान्यवरांनी मिसाळ यांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले .रुग्णालयातून त्यांचे पार्थिव त्यांच्या इंदापूर येथील निवासस्थानी काही काळ/वेळ अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. त्यावेळी पत्रकारिता, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली.