पन्नास वर्षांपूर्वी पवार साहेब एक अपत्यावर थांबले ! कुटुंब नियोजन करा – उपमुख्यमंत्री अजित पवार

हरणं मारायला जाऊ नका नायतर जेलमध्ये चिक्की पिसिंग

पन्नास वर्षांपूर्वी पवार साहेब एक अपत्यावर थांबले ! कुटुंब नियोजन करा – उपमुख्यमंत्री अजित पवार

हरणं मारायला जाऊ नका नायतर जेलमध्ये चिक्की पिसिंग

बारामती वार्तापत्र

उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती दौऱ्यावर होते. यावेळी बारामती तालुक्यातील वढाणे गावात रसिकलाल फाऊंडेशनच्या वतीने जनाई उजव्या कालव्यातून वढाणे गावच्या तलाव्यात पाणी सोडण्याच्या लोकार्पण सोहळा पार पडला, यावेळी अजितदादांची फटकेबाजी पाहण्यास मिळाली.

पन्नास वर्षापूर्वी शरद पवार साहेब एका आपत्यावर थांबले. मी म्हणत नाही की एका आपत्यावर थांबा पण दोन आपत्यावर थांबा असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या स्टाईलने कार्यकर्त्यांना सल्ला दिला.

‘रस्त्याने येताना मला बऱ्याची हरणं पाहण्यास मिळाली. त्यामुळे दिसल्या हरली म्हणून मारायला जाऊ नका. नायतर जेलमध्ये चिक्की पिसिंग अँड पिसिंग करावं लागले. एकतर म्हणालं दादा आम्ही खात नाही, पारधी कुटुंब आहे, ते मारून सात दिवस सुकवून सुकवून खातात. कोण सुकवून खातं देव जाणे. पारधी समाजाला खावटी कीट आपण वाटप केल्या आहे, त्यांनाही समाजात जगण्याचा अधिकार आहे, असं अजित पवार म्हणाले.

कुटुंब मर्यादित ठेवा. आपलं दोन मुलं-मुलगी असं काही किंवा काहीही असलं पाहिजे त्यामुळे दोनवर थांबणं शिका, साहेब,  50 वर्षांपूर्वी एका आपत्यावर थांबले. मी म्हणणार नाही की तुम्ही एकावर थांबा पण दोघांवर थांबा पण कुटुंब नियोजन करा, असा खोचक सल्ला अजित पवारांनी दिला. त्यामुळे  उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram