नवी दिल्ली

परदेशात प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, आंतरराष्ट्रीय उड्डाणे या तारखेपासून सुरू होणार

कोरोनाचे रुग्ण बऱ्यापैकी कमी होत आहेत.

परदेशात प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, आंतरराष्ट्रीय उड्डाणे या तारखेपासून सुरू होणार

कोरोनाचे रुग्ण बऱ्यापैकी कमी होत आहेत.

नवी दिल्ली :प्रतिनिधी

परदेशात प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आंतरराष्ट्रीय विमानसेवा पुन्हा सुरू करण्यात येत आहे. एव्हिएशन रेग्युलेटरी डीजीसीएने दिलेल्या माहितीनुसार, 27 मार्चपासून भारतातून येणाऱ्या आणि जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय व्यावसायिक प्रवासी विमानसेवा पुन्हा सुरू करण्यात येणार आहेत.

कोरोनामुळे भारतात 2 वर्षांपासून बंद असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानसेवा पुन्हा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. दोन वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील बंदी उठवण्यात आली.

चर्चेनंतर घेण्यात आला निर्णय

जगभरात कोविड-19 विरुद्ध लसीकरणाचे (Corona Vaccination Certificate) वाढते प्रमाण लक्षात घेता आणि सर्व संबंधितांशी सल्लामसलत केल्यानंतर, आंतरराष्ट्रीय उड्डाणे पूर्णपणे पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे डीजीसीएने म्हटले आहे. तसेच सध्या विदेशी प्रवासी विमानांवरील लागू करण्यात आलेली बंदी 26 मार्चच्या मध्यरात्री 12 पर्यंत लागू राहणार असून, एअर बबल करारदेखील त्याच कालावधीसाठी अंमलात राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. परदेशी प्रवाशांना भारतात आल्यावर सक्तीने वेगळे ठेवण्याचा नियम सरकारने याआधीच रद्द केला आहे. तथापि, परदेशी प्रवाशाला सक्तीचे लसीकरण पूर्वीप्रमाणेच आवश्यक असणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram