इंदापूर

पुणे सोलापूर महामार्गावर लोंढेवस्ती नजीक ट्रॅव्हल्स पलटली ; अपघातात एक ठार तर २९ जखमी

जखमींवर शासकीय तसेच खाजगी रुग्णालयात उपचार सुरू

पुणे सोलापूर महामार्गावर लोंढेवस्ती नजीक ट्रॅव्हल्स पलटली ; अपघातात एक ठार तर २९ जखमी

जखमींवर शासकीय तसेच खाजगी रुग्णालयात उपचार सुरू

इंदापूर : प्रतिनिधी
पुणे सोलापूर महामार्गावर वरकुटे पाटी परिसरात लोंढेवस्ती नजीक ज्योती ट्रॅव्हल्स या खाजगी कंपनीची बस पलटी होऊन अपघात झाला.या अपघातात बसचा वाहक जागीच ठार झाला. शुक्रवारी (दि.२१) पहाटे साडेपाच वाजता ही घटना घडली.

महामार्ग पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार एम.एच.०३-सी.पी.-३७१५ ही स्लीपर कोच ट्रॅव्हल्स मुंबई वरुन अक्कलकोट कडे निघाली होती.इंदापूर तालुक्यातील वरकुटे पाटी परिसरात लोंढेवस्ती नजीक आली असता बस चालकाला डोळा लागल्याने बस पहिल्या लेन वरुन दुसऱ्या लेन वर जावून रस्ता दुभाजकाला जावून धडकली. त्यानंतर पहिल्या लेन वर बस पलटी झाली. यात वाहक जागीच ठार झाला. या प्रवासी बस मध्ये ४० ते ४५ प्रवासी होते. त्यापैकी २९ प्रवासी जखमी असून दोघे गंभीर आहेत. त्यांच्यावर इंदापूर उपजिल्हा रुग्णालय इंदापूर,सोलापूर शासकीय रुग्णालय व पुणे ससून तर इंदापूर मधील काही खाजगी रूग्णालयात उपचार कामी दाखल करण्यात आले आहे.

ही घटना समजताच इंदापूर महामार्ग पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक शंकर मुटेकर, पोलीस हवालदार संतोष काळे,वसंत कदम,पो.काॅ.तानाजी लोंढे यांसह इंदापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक टी.वाय.मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उपनिरीक्षक दत्तात्रय लिगाडे व त्यांचे सहकारी कर्मचारी, एन.एच.आय.व महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान यांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य केले.स्वर्गीय पै.पांडुरंग रामचंद्र खिलारे गुरुजी प्रतिष्ठान चे रुग्णवाहिका चालक नितीन खिलारे,कै.नानासाहेब व्यवहारे प्रतिष्ठान चे रुग्णावाहिका चालक लोंढे व १०८ रुग्णवाहिकेच्या मदतीने सर्वांना उपचाराकामी रूग्णालयात दाखल करण्यात आले. याशिवाय प्रशांत सिताप,अस्लम शेख,उमेश राऊत,सचिन भिसे आदी सामाजिक कार्यकर्ते मदतीला धावून आले.सर्वांना वेळेत उपचारासाठी दाखल करण्यात रुग्णवाहिका चालक श्री.खिलारे यांनी समयतत्परता दाखवून तात्काळ मदत केल्यामुळे पोलिस निरीक्षक टी.वाय.मुजावर यांनी नितिन खिलारे यांचे बक्षिस देऊन विशेष कौतुक केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button