पर्यावरण जनजागृतीसाठी अंकिता पाटील यांचा इंदापूर तालुक्यात पाच हजार वृक्ष लागवडीचा संकल्प
महाविद्यालयाच्या आवारात वृक्षारोपण करून विद्यार्थी शिक्षकांसह कर्मचाऱ्यांना केले रोपांचे वाटप
पर्यावरण जनजागृतीसाठी अंकिता पाटील यांचा इंदापूर तालुक्यात पाच हजार वृक्ष लागवडीचा संकल्प
महाविद्यालयाच्या आवारात वृक्षारोपण करून विद्यार्थी शिक्षकांसह कर्मचाऱ्यांना केले रोपांचे वाटप
बारामती वार्तापत्र
इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयामध्ये जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या हस्ते महाविद्यालयात बेलाचे रोप लावून वृक्षारोपण करण्यात आले. अंकिता पाटील यांच्या हस्ते विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना 105 बेलांच्या रोपांचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी अंकिता पाटील म्हणाल्या की,’ वाढदिवस हे औचित्य असून सामाजिक बांधिलकी लक्षात घेता पर्यावरणीय जनजागृतीसाठी इंदापूर तालुक्यामध्ये 5000 वृक्ष लागवडीचा संकल्प केला असून यामध्ये युवक युवतींच्या सहभागाबरोबरच नागरिकांनी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केल्याने आनंद झाला आहे.
यावेळी विज्ञान विभाग प्रमुख डॉ. शिवाजी वीर, ग्रंथपाल प्रा. मनीषा गायकवाड, प्रा. कल्पना भोसले उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.रोहिदास भांगे यांनी केले. आभार प्रा. सुनील सावंत यांनी मानले.
संस्थेचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, संस्थेच्या उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव मुकुंद शहा, प्राचार्य डॉ. संजय चाकणे, उपप्राचार्य प्रा. नागनाथ ढवळे, यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अनेक वर्षांमध्ये महाविद्यालयात मान्यवरांचा वाढदिवस महाविद्यालयामध्ये वृक्षारोपण करून साजरा केला जातो तसेच या रोपांचे संवर्धन करण्याची देखील जबाबदारी महाविद्यालय घेते.