पलूस मध्ये स्वरांजली कलामहोत्सव व भव्य किल्ला सजावट स्पर्धा संपन्न
यशस्वी स्पर्धकांना संस्थांच्या वतीने मान्यवरांचे उपस्थितीत रोख रक्कम व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
पलूस मध्ये स्वरांजली कलामहोत्सव व भव्य किल्ला सजावट स्पर्धा संपन्न
यशस्वी स्पर्धकांना संस्थांच्या वतीने मान्यवरांचे उपस्थितीत रोख रक्कम व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
इसलामपूर ;( प्रतिनिधी)
इकबाल पीरज़ादे
दिपावलीनिमित्त युवक गड किल्ले बनवतात. त्यांच्या सर्जनशीलतेला व कलागुणांना वाव मि ळावा तसेच आपल्या ऐतिहासिक वास्तूंचे जतन व्हावे व हा वारसा पुढे असाच अखंडपणे चालत रहावा या उदात्त हेतूने येथील स्वरांजली बहुउद्देशीय सेवाभावी संस्था,नवजीवन सामाजिक सेवाभावी संस्था व ज्ञानदीप बहुउद्देशीय शिक्षण व सामाजिक संस्थेच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे कलामहोत्सव व भव्य किल्ला सजावट स्पर्धा संपन्न झाली.
स्वरांजली कार्यक्रमात संस्थापक अध्यक्ष जयवंत मोहिते,डाॅ.विकास देव व सचिव संजीवनी मोहिते,डाॅ.वैभवी देव,डाॅ.उत्तम देव यांनी गायिलेल्या सखी मंद झाल्या तारका,पाहिले न मी तुला,केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर,रात्रीस खेळ चाले,दिवस तुझे हे फुलायचे,चलते चालते यासारख्या अनेक गाण्यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध करुन सोडले.
यावेळी किल्ला सजावट स्पर्धेत रोहन मोरे,श्रेया मोरे व श्रेयस मोरे यांनी बनविलेला प्रतापगड,वीर सरनाईक आम्ही ग्रुपने तयार केलेला सिंहगड तसेच आर्यन जगताप व शर्विल सुतार यांनी बनविलेल्या रायगड यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त झाले.यशस्वी स्पर्धकांना संस्थांच्या वतीने मान्यवरांचे उपस्थितीत रोख रक्कम व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.यावेळी स्वागत डाॅ.वैष्णवी मोहिते तर आभार डाॅ.सुरेखा देव यांनी मानले.कार्यक्रमाचे संयोजन ऋषी देव,डाॅ.धिरज मोहिते,प्रवीण माने,कृष्णत कदम,आदित्य देव,ओंकार देव,आदिती देव,समीर कदम आदींनी केले