पळसदेव येथे “भगव्या ध्वजाची गुडी” उभारत राज्याभिषेक दिन साजरा..
या वेळी शिवरायांच्या जयघोषात स्वराज्यगुढी सरळ उभी करण्यात आली.

पळसदेव येथे “भगव्या ध्वजाची गुडी” उभारत राज्याभिषेक दिन साजरा..
या वेळी शिवरायांच्या जयघोषात स्वराज्यगुढी सरळ उभी करण्यात आली.
बारामती वार्तापत्र
महाराष्ट्राचं दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन या वर्षीपासून महाविकास आघाडी सरकारतर्फे अनोख्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
इंदापूर तालुक्यातील पळसदेव ग्रामपंचायत कार्यालयासमोर या वेळी भगवी जरी पताका व त्यावर जिरेटोप, सुवर्णहोन, जगदंब तलवार, शिवमुद्रा वाघनखे ह्या शिवरायांच्या पंच शुभचिन्हांनी अलंकृत अशा ध्वजाची गुडी यावेळी उभारण्यात आली. या वेळी १५ फुट उंचीचा बांबु त्याच्यावर सुवर्ण आणि लाल कापडाची गुंडाळी करण्यात आली होती.सुवर्ण कलश, पुष्पहार, गाठी, आंब्याची डहाळी, अष्टगंध, अक्षता, हळद कुंकु. रांगोळी काढत सरपंच इंद्रायणी मोरे यांच्या शुभहस्ते पूजा करण्यात आली. या वेळी शिवरायांच्या जयघोषात स्वराज्यगुढी सरळ उभी करण्यात आली.त्या नंतर राष्ट्रगीत व महाराष्ट्रगीत म्हणुन सांगता करण्यात आली.यावेळी ग्रा.पं सदस्य,शिक्षक ग्रा.पं कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.