पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मिळाली ‘मायेची ऊब
जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने उपक्रम
बारामती वार्तापत्र
बारामतीचे सुपुत्र आणि देशाचे नेते पद्मविभूषण आदरणीय खासदार शरदचंद्र पवारसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जिजाऊ ब्रिगेड बारामतीच्या वतीने ऊस तोडणी कामगारांना त्यांच्या कोप्यावर जाऊन थंडीत उबदार ब्लँकेट, ऊसतोडणी कामगार महिलांना साडी व लहान मुलांना कपडे व केळी वाटप करण्यात आले.
ऊसतोड मजुरांना त्यांच्या कष्टाच्या कामामुळे आपल्या दैनंदिन गरजांकडे लक्ष देता येत नाही लहान मुले ,वृद्ध माणसे यांची काळजी घेण्यास मर्यादा येतात मात्र तरीही ते त्यांचे ऊस तोडी चे कार्य कितीही थंडी असली तरी लहान मुलासह वृद्ध माणसांपर्यंत सर्वजण करत असतात त्यामुळे त्यांना या थंडीतही मायेची उब मिळावी म्हणून जिजाऊ ब्रिगेडच्या महिला कार्यकर्त्यांनी त्यांना त्यांच्या तांड्यावर जाऊन घरपोच साहित्य दिले त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणित झाला होता. या वेळी माळेगाव साखर कारखान्याचे संचालक यांचा सत्कार करण्यात आला.