इंदापूरक्राईम रिपोर्ट

पशुधन चोरी करणाऱ्यांना वालचंदनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

३ लाख ४० हजाराचा मुद्देमाल जप्त

पशुधन चोरी करणाऱ्यांना वालचंदनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

३ लाख ४० हजाराचा मुद्देमाल जप्त

इंदापूर : प्रतिनिधी

मागील काही दिवसापासून वालचंदनगर पोलीस स्टेशन च्या परिसरामध्ये जनावरांची चोरी करण्याचे प्रमाण वाढले होते. याला आळा घालण्यासाठी वालचंदनगर पोलिस आरोपींच्या मागावर होते.यासाठी एका स्वतंत्र पथकाची नेमणूक करण्यात आली होती. अखेर गुरूवारी दि.24 रोजी या जनावर चोरांच्या मुसक्या आवळण्यात वालचंदनगर पोलिसांना यश आले.

वालचंदनगर पोलीसांत आरोपी सुनिल विश्वास गंगावणे, अक्षय दादा बोरकर,संदिप सुरेश फाळके सर्व रा. गुनवडी ता. बारामती यांचेवर भारतीय दंड संहिता 379, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुधवार दि.23. रोजी पोलीस उपनिरीक्षक नितीन लकडे, पोलीस काँ.जगताप, चालक पो.काँ. बेलदार व होमगार्ड कदम हे रात्रगस्त करित असताना दि.24 रोजी पहाटे 2 वाजताच्या सुमारास काझड लाकडी रोड वरील शिंदेवाडी गावचे हद्दीतील माळवे वस्ती जवळ त्यांना एका टाटा कंपनीच्या टेम्पो वरती संशय आला.त्यानंतर वाहनाची तपासणी केली असता 2 शेळ्या,1 बोकड असा मुद्देमाल पोलिसांना मिळून आला. त्याबाबत चालकाकडे विचारना केली असतात त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.

या सर्व प्रकरणावर पोलिसांचा अधिक संशय वाढल्याने पोलिसांनी सुनिल विश्वास गंगावणे,अक्षय दादा बोरकर,संदिप सुरेश फाळके सर्व रा. गुनवडी ता. बारामती जि.पुणे यांसह MH-42-AQ-4237 क्रमांकाचे चार चाकी वाहन व शेळ्या असा एकूण 3 लाख 40 हजारांचा सर्व माल ताब्यात घेतला व त्यांना वालचंदनगर पोलीस ठाण्यात आनले.

शिंदेवाडी पोलीस पाटील यांनी फोनवरुन पोलीस उप निरक्षक श्री.लकडे यांना शेळ्या चोरी झाल्याबाबतची अगोदरचं कल्पना दिली होती. त्यानुसार पोलिसांनी थोडा खाक्या दाखवताचं सदर आरोपींनी मौजे शिंदेवाडी येथील किसन दत्तु माळवे यांचे घरासमोरुन शेळ्या चोरल्याची कबूली दिली.असुन सदर गुन्ह्याचा पुढील तपास पो.ना. पाटील हे करीत आहेत.

सदरची कारवाई अभिनव देशमुख पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण,मिंलिद मोहिते अपर पोलीस अधिक्षक बारामती विभाग यांचे सुचनेप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक वालचंदनगर दिलीप पवार, पोलीस उपनिरीक्षक नितीन लकडे,पोलीस अंमलदार जगताप, चालक पो.काँ. बेलदार व होमगार्ड कदम यांनी पार पाडली.

वालचंदनगर पोलीसांनी यापुर्वी ही शेतक-याचे पशुधन चोरी करणाऱ्यांना अटक करुन शेतकऱ्यांचे चोरीस गेलेले पशुधन परत केले आहे. सदरच्या कारवाई शेतकरी बांधव यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Related Articles

Back to top button