पहाडी आवाजाने महाराष्ट्राला मंत्रमुग्ध करणाऱ्या राधा खुडेंचा हर्षवर्धन पाटील यांनी केला सत्कार
वालचंदनगरकरांनी केले जंगी स्वागत

पहाडी आवाजाने महाराष्ट्राला मंत्रमुग्ध करणाऱ्या राधा खुडेंचा हर्षवर्धन पाटील यांनी केला सत्कार
वालचंदनगरकरांनी केले जंगी स्वागत
इंदापूर : बारामती वार्तापत्र
वालचंदनगर (ता. इंदापूर) येथील राधा दत्तू खुडे हिने कलर्स वाहिनीवरील सुर नवा ध्यास नवा या रियलिटी शो मधून आपल्या पहाडी आवाजाने उभ्या महाराष्ट्राला मंत्रमुग्ध करत तृतीय क्रमांक पटकावला. गुरुवारी (दि.१८) वालचंदनगर येथे तिचे आगमन होताच वालचंदनगरकरांनी जंगी स्वागत केले.
राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील तसेच नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी तिचा सत्कार करीत गायन क्षेत्रात करिअरसाठी शुभेच्छा दिल्या.राधा खुडे हिने कला शिक्षक प्रशिक्षण घेतले आहे. हर्षवर्धन पाटील यांच्या भेटीप्रसंगी तिने मला या क्षेत्रात पदवी संपादन करावयाचे असल्याचे सांगितले.
हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांच्याशी आपले चांगले व्यक्तिगत संबंध आहेत. त्यांच्याशी संपर्क करून गायन क्षेत्रात पदवी प्राप्त करण्यासाठी राधा खुडे यांना सहकार्य करून सर्वतोपरी मदत करणार असल्याचे सांगितले.राधा खुडे ही सर्वसामान्य कुटुंबातील असून महाराष्ट्रातील सांस्कृतिक क्षेत्रात आज इंदापूर तालुक्याचे नाव तिने केले असल्याचे मत यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.