निमगाव केतकी ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार कोवीड लसीकरणात वशिलेबाजी सामान्य नागरिक हवालदिल!
सकाळी आठ वाजल्यापासून लसीकरण रजिस्ट्रेशन साठी थांबले होतो.

निमगाव केतकी ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार कोवीड लसीकरणात वशिलेबाजी सामान्य नागरिक हवालदिल!
सकाळी आठ वाजल्यापासून लसीकरण रजिस्ट्रेशन साठी थांबले होतो.
निलेश भोंग; बारामती वार्तापत्र
निमगाव केतकी येथील ग्रामपंचायत मध्ये लसीकरणाचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन चालू असून सकाळी आठ वाजल्यापासून नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. परंतु गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच ग्रामपंचायत सदस्य यांच्या वशिलेबाजी ने त्यांच्या जवळील लोकांना त्वरित लसीकरण करण्याचे काम सध्या निमगाव केतकी ग्रामपंचायत हद्दीत पहावयास मिळत आहे. यामुळे सामान्य नागरिकांत प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.
यावेळी बोलताना महेश मोरे यांनी सांगितले की आम्ही सकाळी आठ वाजल्यापासून लसीकरण रजिस्ट्रेशन साठी थांबले होतो. परंतु लसीकरणाच्या ठिकाणी 40 ते 50 लोकांची रांग लागली जाते, या लोकांनी रजिस्ट्रेशन न करता रांग कशी लावली चा अर्थ लागलेली रांग वशिलेबाजी ने लागली असून सामान्य नागरिक मात्र लसीकरण रजिस्ट्रेशन साठी तीन ते चार तास रांगेत उभे राहावे लागते.
यानिमित्ताने निमगाव केतकी ग्रामपंचायतीचा वशिलेबाजी चा कारभार चव्हाट्यावर आला असून या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन लसीकरणासाठी योग्य ते नियोजन करून लसीकरण करावे अशी मागणी निमगांव केतकी येथील नागरिकांमधून होत आहे. त्याचप्रमाणे इंदापूर तालुक्यात खूप मोठ्या प्रमाणात कोवीड रुग्ण सापडत असून कोवीड रजिस्ट्रेशन करताना होत असलेली गर्दी ही चिंतेची बाब असून यामुळे रुग्ण वाढण्याची शक्यता निर्माण होत आहे.