पाच महिन्यापासून सुरू असलेला संभ्रम दूर;माळेगावच्या नगरपंचायतीवर शिक्कामोर्तब
माळेगाव बुद्रूकचा पहिला नगराध्यक्ष व नगरसेवक होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी आरक्षण सोडतीनुसार आपापल्या प्रभागात मतदारांची मते जाणून घेण्यास सुरूवात केली होती.

पाच महिन्यापासून सुरू असलेला संभ्रम दूर;माळेगावच्या नगरपंचायतीवर शिक्कामोर्तब.
माळेगाव बुद्रूकचा पहिला नगराध्यक्ष व नगरसेवक होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी आरक्षण सोडतीनुसार आपापल्या प्रभागात मतदारांची मते जाणून घेण्यास सुरूवात केली होती.
बारामती वार्तापत्र
माळेगांव ग्रामपंचायतीची नगरपंचायतीमध्ये करण्यात आलेली रूपांतर प्रक्रिया नियमबाह्य पद्धतीने झाल्याचा ठपका ठेवत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यातआली होती त्या अनुषंगाने उच्च न्यायालयाने नगरपंचायतबाबत घेण्यात आले आक्षेप फेटाळून लावत माळेगांव नगरपंचायतीवर शिक्का मोर्तब केले.दरम्यान निवडणुकीचा मार्ग मोकळा झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या
कार्यकर्त्यांनी फटाके फोडून गुलालाची उधळण आनंद व्यक्त केला.
ऐन ग्रामपंचायत निवडणुकीच्या धामधुमीत नगर विकास सचिवाने तब्बल तीन वेळा नगरपंचायतची उदषोषणा करण्यात आली होती.मात्र निवडणूक आयोगाकडून ठोस निर्णय झाला नसल्याने ग्रामपंचायत निवडणूकीसाठी ७७ उमेदवारापैकी ७६ जणांनी सामुहिक अर्ज माघारी घेतल्याने ग्रामपंचायत निवडणूक होऊ शकली नाही.त्यामुळे गेली पाच महिने झाले ग्रामपंचायत की नगरपंचायत याबाबत चर्चांना उधाण आले होते.
माळेगांव ग्रामपंचायतीचे मावळते सरपंच जयदिप विलास तावरे यांनी ग्रामसभेचा ठराव नसणे ,अकुक्षीक कामगार संख्या चूकीची दाखवणे,गांवमध्ये ९२ टक्के कुषीक्षेत्र आहे, बारामती नगरपरिषद पासून अंतर कमी असणे,असे नगरपंचायत रूपांतर प्रक्रियावर आक्षेप घेत मे २०२१ मध्ये सर्वसामान्यच्या भावनाचा विचार करत उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती.
तेव्हा पासुन जवळ पास दहा महिने नगरपंचायत रूपांतर प्रक्रियाबाबत न्यायालयाचा ससेमिरा सुरू होता.दरमान्य आज मुंबई उच्च न्यायालयाने नगरपंचायतबाबत घेण्यात आले आक्षेप फेटाळून लावल्यामुळे नगरपंचायतीवर शिक्का मोर्तब झाले आहे.दरम्यान याबाबत माजी सरपंच जयदिप विलास तावरे म्हणाले न्यायदेवतेने दिलेल्या निर्णयाचा आम्ही आदर करत आहोत.
दरम्यान माळेगाव नगरपंचायतीची अंतिम रचना होत नाही तोपर्यंत नगरपंचायतीची कार्य व कर्तव्य पार पाडण्यासाठी बारामतीचे तहसीलदार विजय पाटील यांच्या प्रशासक म्हणून नियुक्ती केल्याचे उपसचिव मोघे यांनी पत्रात नमूद केले आहे.