पाच वर्षात देशातून ३८ घोटाळेबाज पळाले; केंद्र सरकारचा खुलासा.
१४ लोकांच्या विरोधात प्रत्यार्पणाची विनंती वेगवेगळ्या देशांकडे पाठविली गेली आहे. तर ११ लोकांविरूद्ध फरारी आर्थिक गुन्हेगार कायदा, 2018 अंतर्गत अर्ज दाखल केले आहेत.

नवी दिल्ली :बारामती वार्तापत्र रिपोर्ट
तब्बल ३८ घोटाळेबाज देशातून पळून गेले आहेत. १ जानेवारी २०१५ ते ३१ डिसेंबर २०१९ या दरम्यान ३८ जणांनी देशातून पलायन केले आहे. याबाबतची माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी संसदेत दिली आहे. खासदार डीन कुरियाकोसे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ठाकूर यांनी हा खुलासा केला आहे.
राज्यमंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, ‘सीबीआयने दिलेल्या अहवालानुसार १ जानेवारी २०१५ ते ३१ डिसेंबर २०१९ दरम्यान बँकांमधील आर्थिक घोटाळ्या प्रकरणात गुंतलेले ३८ लोक देशातून पळून गेले आहेत.
यातील २० लोकांविरूद्ध रेड कॉर्नर नोटीस बजावण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाने इंटरपोललाही माहिती दिली आहे.
१४ लोकांच्या विरोधात प्रत्यार्पणाची विनंती वेगवेगळ्या देशांकडे पाठविली गेली आहे. तर ११ लोकांविरूद्ध फरारी आर्थिक गुन्हेगार कायदा, 2018 अंतर्गत अर्ज दाखल केले आहेत.
यातील दोन फरारी सनी कालरा आणि विनय मित्तल यांना देशात परत आणले आहे. कालरा यांच्यावर पंजाब नॅशनल बँकेत १० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे, तर मित्तल यांच्यावर विविध बँकांमध्ये ४० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आहे.
दरम्यान, उर्वरित घोटाळेबाजांना अद्याप इतर देशांनी भारताकडे सुपूर्द केले नाही. या यादीत ९००० कोटींच्या घोटाळ्यातील आरोपी विजय मल्ल्या, १२००० कोटींच्या घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सी, नीरव मोदी आणि त्यांच्या कुटुंबीयांचाही समावेश आहे. दरम्यान, सांदेसरा समुहाच्या मालकावर १५००० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आहे.