पाटबंधारे विभागाचे अधिकारी नियमबाह्य पद्धतीने पाण्याची विक्री करतात – रत्नाकर मखरे
पाणी प्रश्नावर मखरेंच एकदिवसीय लाक्षणिक उपोषण
पाटबंधारे विभागाचे अधिकारी नियमबाह्य पद्धतीने पाण्याची विक्री करतात – रत्नाकर मखरे
पाणी प्रश्नावर मखरेंच एकदिवसीय लाक्षणिक उपोषण
इंदापूर : प्रतिनिधी
खडकवासला पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता श्री.चोपडे आणि कार्यकारी अभियंता श्री.पाटील हे नियमबाह्य पद्धतीने पाण्याची विक्री करून उन्हाळ्याच्या नियंत्रणाच्या काळात लाखो रुपये कमावतात असा गंभीर आरोप रत्नाकर मखरे यांनी केला असून अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करून त्यांना त्वरित अटक करावी व शेतकऱ्यांचे झालेले आर्थिक नुकसान सदरील अधिकाऱ्यांकडून सरकारने वसूल करून शेतकऱ्यांना सुपूर्द करण्याच्या मागणीसाठी मखरे हे खडकवासला प्रकल्प सिंचन व्यवस्थापन उपविभाग इंदापूर कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत.
यावेळी बोलताना मखरे म्हणाले की,पाटबंधारे खात्याच्या पाणीवाटपाचा नियम टेल टू हेड असा असताना सदरील अधिकारी हेड टू टेल असे पाणी वाटप करतात. माझी भिमाई पाणी वापर सहकारी संस्था असून ती गलांडवाडी नं.२ च्या हद्दीत येत असून माझ्या सोसायटीच्या हद्दीतील शेतकऱ्यांना गेल्या १५ दिवसांपूर्वी पाणी मिळाले असते तर गहू, हरभरा, ज्वारी,मका इत्यादी पिकांना जीवदान मिळाले असते.परंतु पाणी वेळेवर न मिळाल्याने माझ्या सोसायटी च्या शेत्रातील शेतकऱ्यांची उभी पिके पाण्यावाचून करपून गेली व शेतकऱ्यांचे कधीही भरून न येणारे आर्थिक नुकसान श्री.चोपडे व श्री. पाटील या अधिकाऱ्यांमुळे झाले असल्याचे म्हणत त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. या संदर्भात शासन प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी निवेदनाच्या प्रती संबंधितांना स्पीड पोस्टाच्या द्वारे यापूर्वी पाठवल्या असून माझं उपोषण सत्तेच्या विरोधात नसून खडकवासला पाटबंधारे विभागाच्या मुजोर व निर्डावलेले अधिकाऱ्यांच्या विरोधात आहे असे यावेळी त्यांनी सांगितले.