रयत शिक्षण संस्थेमधील विजय पवार कलाशिक्षक यांचे कोरोना काळात अमुल्य योगदान
या वेळी इंदापुरचे तहसीलदार अनिल ठोंबरे साहेब स्वतः उपस्थित होते

रयत शिक्षण संस्थेमधील विजय पवार कलाशिक्षक यांचे कोरोना काळात अमुल्य योगदान
या वेळी इंदापुरचे तहसीलदार अनिल ठोंबरे साहेब स्वतः उपस्थित होते
बारामती वार्तापत्र
कोरोनाच्या काळात गरजु रुग्नांकरीता व शासकीय रुग्णालय यांना मदतीचा हात देण्याची गरज आहे. कोरोनाचे संकट काही अंशी कमी होत चालले असुन ही एक दिलासादायक बाब आहे, कोरोचे प्रमाण कमी होणे म्हणजे नागरिकांनी ठेवलेला संयम व शासनाने घालुन दिलेले निर्बंध पाळल्यामुळे त्याचे फळ आहे असे म्हणता येईल तरीही आपण नागरिकांनी शासनाचे निर्बंध घातले आहेत ते पाळले पाहीजे गाफील राहुन जमणार नाही जेणेकरून कोरोनाना सारख्या राक्षसाचे पुन्हा तोंड वर निघणार नाही. आणि कोणाची तिसरी लाट येण्या आगोदरच तिला थांबवता येईल.
यातुनच समाजाची बांधिलकी मनात ठेवून व्याहाळी गावांने एक नवा आदर्श घालुन दिला आहे आत्ता पर्यंत 35 ऑक्शिजन सिलिंडर शासकीय रुग्णालयासाठी देण्यात आले तसेच शासकीय रुग्णालय बावडा या ठिकाणी इंजेक्शन अथवा लस ठेवण्यासाठी एक फ्रिज देण्यात आला असुन याच्या मध्ये इंदापुर चे तहसीलदार अनिल ठोंबरे साहेब यांनी सुध्दा सहभाग घेतला याचा खुप आनंद आहे तसेच विजय पवार, सागर पवार, दिपक लोखंडे (डाळींब तज्ञ) सुनिल शिंदे, सोमनाथ दिवसे, किशोर गायकवाड, विनायक पाटोळे, रोहन गिरीमकर (श्रीगोंदा) एक शासकीय रुग्णालयास मदत करण्यात आली असुन तरुणांनी पुढे येवुन मदत करावी अशी विनंती वारंवार विजय पवार करत आहेत.
या वेळी इंदापुरचे तहसीलदार अनिल ठोंबरे साहेब स्वतः उपस्थित होते त्याचबरोबर डाॅ. सुनिल गावडे तालुका आरोग्य अधिकारी, डाॅ. शेळके वैद्यकीय अधिक्षक उपजिल्हा रुग्णालय, डाॅ. चंदनशिवे वैद्यकीय अधिकारी, सरपंच किरण पाटील,उपसरपंच निलेश घोगरे, दादा कांबळे ग्रामपंचायत सदस्य, डाॅ. गायकवाड, डाॅ. कपिल वाघमारे, डाॅ. हिना काझी, परिचारिका अर्चना लोखंडे उपस्थित होते