क्राईम रिपोर्टदौंड

पाटस येथील दुहेरी हत्याकांडातील चौघे आरोपी जेरबंद : पुणे ग्रामीण एलसीबी पथकाची कामगिरी

पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चार जणांच्या ताब्यात घेतले असून पुढील कारवाईसाठी यवत पोलिसांच्या ताब्यात

पाटस येथील दुहेरी हत्याकांडातील चौघे आरोपी जेरबंद : पुणे ग्रामीण एलसीबी पथकाची कामगिरी

पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चार जणांच्या ताब्यात घेतले असून पुढील कारवाईसाठी यवत पोलिसांच्या ताब्यात

क्राईम ; बारामती वार्तापत्र

पाटस गावातील तामखडा येथे दोघांची तलवारीने वार करुन, दगडाने ठेचून निर्घृण हत्या रविवारी ( दि. 4 जुलै) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास करण्यात आली होती. याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चार जणांना ताब्यात घेतले आहे. महेश उर्फ मन्या संजय भागवत (वय 22 वर्षे, रा. पाटस, तामखडा ता.दौंड, जि.पुणे), महेश मारुती टुले (वय 20 वर्षे, रा. पाटस, तामखडा ता.दौंड जि.पुणे), युवराज रामदास शिंदे (वय 19 वर्षे, रा.गिरीम, मदनेवस्ती, ता.दौंड, जि.पुणे) व गहिनीनाथ बबन माने (वय 19 वर्षे, रा. गिरीम, राघोबानगर, ता. दौंड, जि.पुणे), असे अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, दौंड तालुक्यातील पाटस गावातील तामखडा येथील भानोबा मंदिरासमोर महेश उर्फ मन्या भागवत याने शिवम शितकल यास फोनवरुन शिव्या देवून तामखडा येथे बोलविले. त्यानंतर शिवम संतोष शितकल (वय 23 वर्षे) व गणेश रमेश माकर (वय 23 वर्षे, दोघे रा.पाटस, अंबिकानगर ता. दौंड, जि.पुणे) हे शिव्या का दिल्या याचा जाब विचारण्यासाठी गेले होते. त्यावेळी महेश उर्फ मन्या संजय भागवत, महेश मारुती टुले व त्यांच्यासोबत आलेल्या 4 ते 5 साथीदारांनी शिवम व गणेश या दोघांना तलवार, काठ्यांनी मारहाण केली. त्यानंतर त्यांचे डोके दगडाने ठेचून निर्घृणपणे हत्या केली. याप्रकरणी भा.दं.वि.चे कलम 302, 143, 147, 148, 149, 504, 506 आर्म अ‌ॅक्टचे कलम 4 व 25 प्रमाणे खुनाचा गुन्हा यवत पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता.

सदरची कामगिरी ही मा.पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख सो., बारामती विभाग अपर पोलिस अधीक्षक श्री.मिलींद मोहिते सो., दौंड उपविभागीय पोलिस अधिकारी श्री राहुल धस सो. यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.पद्माकर घनवट,पोउपनि रामेश्वर धोंडगे, पोहवा. महेश गायकवाड, पोहवा. निलेश कदम, पोहवा. दत्ता तांबे, पोहवा. सचिन गायकवाड, पोहवा. सुभाष राऊत, पो.ना. गुरु गायकवाड, पो.ना. अभिजित एकाशिंगे, सफौ. काशिनाथ राजापुरे सफौ. शब्बीर पठाण, पोहवा. विद्याधर निश्चित,पोहवा. प्रमोद नवले,पोना. गुरु जाधव यांनी केलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!