पाडव्या दिवशी पवार कुटूंबीय भेटणार डॉ आप्पासाहेब पवार सभागृहात
यंदा भेटीसाठी येताना कोणीही भेटवस्तू किंवा पुष्पगुच्छ आणू नयेत असे आवाहन करण्यात आले आहे.

पाडव्या दिवशी पवार कुटूंबीय भेटणार डॉ आप्पासाहेब पवार सभागृहात
यंदा भेटीसाठी येताना कोणीही भेटवस्तू किंवा पुष्पगुच्छ आणू नयेत असे आवाहन करण्यात आले आहे.
बारामती वार्तापत्र
दरवर्षी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या गोविंद बाग या निवासस्थानी होणाऱ्या दिवाळी भेट कार्यक्रमाच्या स्थळात यावर्षी बदल झाला आहे. गोविंद बागेऐवजी हा कार्यक्रम डॉ. आप्पासाहेब पवार सभागृहात होणार आहे. या कार्यक्रमात शरद पवार यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, पार्थ पवार हे सहभागी होवून कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारणार आहेत.
वर्षातील एक दिवस आपल्या नेतृत्वाला भेटण्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी बारामतीकरच नव्हे तर पंचक्रोशीसह राज्याच्या विविध भागातून लोक येतात. बारामती पाडव्याच्या दिवशी गर्दीने फुलून जाते, यंदा कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर बारामतीत येणा-या सर्वांनीच व स्थानिकांनीही मास्क व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
दरवर्षी दिवाळीच्या पाडव्याला शरद पवार व पवार कुटुंबियांना शुभेच्छा देण्यासाठी राज्याच्या कानाकोप-यातून लोक येत असतात. खासदार, आमदार, मंत्रीमंडळातील सदस्य, पदाधिकारी यांच्यासह समाजाच्या विविध स्तरातील लोक शरद पवार यांच्या भेटीसाठी येत असतात.
यंदा भेटीसाठी येताना कोणीही भेटवस्तू किंवा पुष्पगुच्छ आणू नयेत असे आवाहन करण्यात आले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून बारामतीतील गोविंद बागेत संपूर्ण पवार कुटुंबीय कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारत असतात. गेल्यावर्षी कोरोनामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. आता मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे दिवाळी भेटीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. परंतु कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन होवू नये यासाठी या कार्यक्रमाच्या स्थळात बदल करण्यात आला आहे.
गोविंद बागेलगत असलेल्या आप्पासाहेब पवार सभागृहात हा दिवाळी भेटीचा कार्यक्रम होणार आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, पार्थ पवार हे यावेळी उपस्थित राहून कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारणार आहेत. दरम्यान, आप्पासाहेब पवार सभागृहात होत असलेल्या या कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली आहे.