‘पाणी वाचवा, बेटी वाचवा’चा दिला संदेश
इंदापुरातील सर्व पंथांची एकत्रित पालखी मिरवणूक

‘पाणी वाचवा, बेटी वाचवा’चा दिला संदेश
इंदापुरातील सर्व पंथांची एकत्रित पालखी मिरवणूक
इंदापूर प्रतिनिधी –
जैन धर्मियांचे चोवीसावे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त इंदापूर शहरात दिगंबर, श्वेतांबर व स्थानकवासी या सर्व पंथांनी एकत्र सवाद्य पालखी मिरवणूक काढून ‘पाणी वाचवा, बेटी वाचवा’ असा संदेश दिला.
राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मधुकर भरणे, पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, माजी नगराध्यक्ष अंकिता शहा, शहा ग्लोबल स्कूलचे विश्वस्त मुकुंद शहा, कर्मयोगी कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा, इंदापूर रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष संजय दोशी, माजी उपनगराध्यक्ष कृष्णा ताटे, सामाजिक कार्यकर्ते हमीद आतार, महादेवचव्हाण यांनी पालखी मिरवणुकीचे स्वागत करून राष्ट्रीय एकात्मता व सर्वधर्म समभावाचे दर्शन घडविले. उपरोक्त मान्यवरांनी भगवान महावीर यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.
श्री १००८ शांतीनाथ दिगंबर जैन मंदिर पासून भगवान महावीर यांच्या जयघोषात पालखी मिरवणुकीस प्रारंभ झाला.महतीनगर, शहरातून जाणारा जुना पुणे सोलापूर महामार्ग, खडकपूरा, मुख्य बाजार पेठ, वासुपूज्य श्रवेतांबर जैन मंदिर, नेहरू चौक व संभाजी चौक मार्गे मिरवणुकीचा समारोप श्री १००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरात झाला. येथे पारंपरिक पद्धतीने पूजा, अर्चा करण्यात आली.
श्री १००८ शांतीनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. श्रेणिक शहा, श्री १००८ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर ट्रस्टचे संचालक मिलिंद दोशी, वासुपूज्य श्वेतांबर जैन मंदिरचे अध्यक्ष नरेंद्र गांधी, सचिव पारसमल बागरेचा, डॉ. सागर दोशी, शिरीन दोशी, निलेश मोडासे, सागर दोशी म्हसवडकर, अरुण दोशी, महावीर शहा, भारत दोभाडा, संकेत चंकेश्वरा, प्रीतम भालेराव, धीरज गांधी, डॉ. आशिष दोभाडा, जवाहर बोरा, चंद्रशेखर दोशी, प्रशांत शहा, पीयूष बोरा, प्रकाश बलदोटा, पिंटू मेहता, सुभाष गांधी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मिरवणुकीत भारतीय जैन संघटनेचे शहराध्यक्ष धरमचंद लोढा यांनी डिंक लाडू, पाणी, पारसमल बागरेचा यांनी शीतपेय तर माजी नगरसेवक मिलिंद दोशी यांनी पेढे वाटप केले.