पारधी समाज्याला दफन भूमी देण्याची मागणी
प्रशासन ने आश्वासन पाळण्याची मागणी
बारामती:वार्तापत्र
स्वातंत्र्याचा पाढा वाचत, न्याया हक्कासाठी भिक्षा मागत फिरलो,जिवंत पणे सोडा परंतू मर्णानंतर जिंकलो.आज प्रेताला हक्काची जागा मिळाली म्हणून प्रेत हसले . शेवराई सेवाभावी संस्थाच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे आदिवासी पारधी समाजातील लोकांना दफन करण्यासाठी हकाची जागा मिळवण्यासाठी प्रयत्न चालू होते. पुण्याचे जिल्हाधिकारी डाॅ राजेश देशमुख साहेब व बारामतीचे उपविभागीय दंडाअधिकारी मा दादासाहेब कांबळे साहेब यांनी विषेश लक्ष दिल्यामुळे बारामती व इदापुर तालुक्यातील पारधी समाजातील लोकांनसाठी स्वातंत्र्य दफन भुमी देण्यात येईल असे अश्वासन दिले गेले,व पिढीत कुटुंबाला नहाक त्रास देणार्या गावावर कडक कारवाई करण्यात येईल असे कांबळे बोलत होते ,परंतू सदर या कांमामध्ये कोंननत्याही ग्रामपंचायतीने हस्तक्षेप करु नये असे आदिवासी समाजसेवक व साहित्यिक नामदेव भोसले यांनी मागणी केली आहे, आज आदिवासी पारधी लोक गेले 80 वर्ष अन्यायाच्या ओझ्याखाली दडपलेले आहेत. स्वातंत्र्यापासून एकच मागणी करत आहेत, रहाण्यासाठी जागा द्या, आम्हाला घर द्या,शासनाच्या सवलती द्या,असे म्हणत गावच्या दारादारात भिक्षा मागत आयुष्याचा शेवटचा श्वास घेतलेल्या मधुकर भोसले यांना जिवंत पणे गावकर्यानी रहाण्यासाठी जागा दिली नाही,परंतू त्याच मधुकर भोसले यांना मर्णानंतर त्यांच्या प्रेताला जागा मिळवण्यासाठी अथांग प्रयत्न करावे लागले, आज मधुर भोसले यांना दफन करण्यासाठी हकाची जागा मिळाली,त्यांच्या घरचे लोक आनंदीत आहेत, परंतू पारधी समाजातील प्रत्येक प्रेताला जागा मिळवण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते.ते थांबावे असी मागणी शेवराई सेवाभावी संस्था च्या माध्यमातून करण्यात आले आहे, पंरतू या पुढे कोणत्याही गावा कडून गरीब पिढीत पारधी कुटुंबाला नहाक त्रास होणार नाही. व या पुढे प्रशासन नेहमी आदिवासी पारधी कुटुंबाला न्याय देण्यासाठी अग्रेसर राहील असे अश्वासन बारामतीचे उपविभागीय दंडाअधिकारी मा दादासाहेब कांबळे यांनी दिले आहेत, आज शेवराई सेवाभावी संस्थाच्या माध्यमातून अध्यक्ष व आदिवासी समाजसेवक , नामदेव भोसले यांनी बारामतीचे उपविभागीय दंडाअधिकारी मा दादासाहेब कांबळे साहेब यांना निवेदन देण्यात आले, या वेळी निवेदन देताना साहित्यिक. नामदेव ज्ञानदेव भोसले , विजाबाई भोसले, पत्रकार.महेश पवार, सचिन भोसले, मनिषा पवार,सचिन राऊत, रोहित भोसले, बलवर पवार, कुणाल भोसले,,स्वप्रित भोसले, संतोष भोसले, पिंटू भोसले, नितीन शिंदे यांच्या उपस्थितीत होते,