पार्थ पवार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, ‘ऑपरेशन लोटस’ची सुरुवात पवारांच्या घरातून?
आजोबांविरोधात नातू मोठा निर्णय घेणार का? असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित केले जात आहे.
पार्थ पवार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, ‘ऑपरेशन लोटस’ची सुरुवात पवारांच्या घरातून?.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांच्यावर प्रसारमाध्यमांसमोर टीका केली होती. या टीकेनंतर पार्थ पवार मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पार्थ पवार पक्ष सोडणार असल्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. (Parth Pawar May Leave NCP after Sharad Pawar Criticism)
पार्थ पवार लवकरच मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. नुकतंच खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीत पार्थबद्दल अनेक चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पार्थ वेगळा मार्ग निवडणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
आजोबांविरोधात नातू मोठा निर्णय घेणार का? असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित केले जात आहे.
महाराष्ट्रात भाजपचं ऑपरेशन लोटस सुरु?
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरु असलेल्या घडामोडींमुळे महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघालं आहे. शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांना प्रसारमाध्यमांसमोर अपरिपक्व म्हटल्यानंतर राष्ट्रवादीतील शरद पवार आणि अजित पवार हे दोन नेते समोरासमोर येण्याची शक्यता आहे. या प्रकरणावर अजित पवार यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
पार्थ पवार कोणताही निर्णय आपल्या वडिलांना विचारल्याशिवाय घेऊ शकत नाही. दुसरीकडे राणे कुटुंबाने पार्थ पवार यांची पाठराखण केली आहे. त्यामुळे भाजपकडून ऑपरेशन लोटस हे महाराष्ट्रात सक्रीय झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
पार्थ पवार पक्ष सोडणार?
पार्थ पवार काहीतरी मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. पार्थ पवार प्रसारमाध्यमांसमोर अपमान झाला म्हणून पक्ष सोडण्याचा निर्णय घेऊ शकतात, असं मत काही राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
पदवीधर मतदारसंघात पार्थ पवार यांना उमेदवारी द्यावी, असा आग्रह अजित पवार यांचा होता. पण त्यालादेखील शरद पवार यांनी विरोध केला. पदवीधर मतदारसंघात पार्थ पवार यांना उमेदवारी देता येणार नाही, ही भूमिका शरद पवार यांनी घेतली. त्यावरुन वाद निर्माण झाला,
शरद पवार काय म्हणाले होते?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फत करण्याची मागणी केली होती. त्यावर भाष्य करताना पवार म्हणाले, ‘माझ्या नातवाच्या बोलण्याला आम्ही कवडीचीही किंमत आम्ही देत नाही, तो इमॅच्युअर आहे. सीबीआय चौकशीबाबत बोलायचं, तर मी म्हणेन, महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलिसांवर माझा पूर्ण विश्वास आहे. पण जर कोणी म्हणत असेल, अन्य चौकशीबाबत, तर त्याला विरोध असण्याचं कारण नाही’
पार्थ पवार यांची प्रतिक्रिया
‘शरद पवार यांच्या बोलण्यावर सध्या मला काहीही बोलायचं नाही’, अशी प्रतिक्रिया पार्थ पवार यांनी दिली होती.
पहिली भूमिका
पार्थ पवार यांनी 27 जुलै रोजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. ही संपूर्ण देश, विशेषत: तरुणांची भावना आहे, असे ट्वीट पार्थ पवारांनी भेटीनंतर केले होते.
दुसरी भूमिका
‘आम्ही कोरोनाशी लढण्यावर उपाययोजना करत आहोत, पण मंदिर बांधून कोरोना जाईल असं काही जणांना वाटतं’ असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले होते. मात्र त्यानंतर पार्थ पवारांनी भूमिपूजनाच्या दिवशी ‘जय श्रीराम’चा नारा देत राम मंदिर निर्माणाला शुभेच्छा दिल्या. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात होते.
पार्थ पवार यांचा परिचय
पार्थ पवार हे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचे सुपुत्र. राष्ट्रवादीच्या तिकिटावर पार्थ पवार 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघातून निवडणुकीला उभे राहिले होते. मात्र शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी जवळपास 2 लाख मतांनी पार्थ पवार यांचा पराभव केला होता. (Parth Pawar May Leave NCP after Sharad Pawar Criticism)
संंबंधित बातम्या :
नया है वह, पार्थ पवारांबाबतचा प्रश्न छगन भुजबळांनी टोलावला
पार्थ पवारच्या बोलण्याला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही : शरद पवार
अजितदादा नाराज नाहीत, शरद पवार कुटुंबप्रमुख, त्यांना प्रत्येकाला सूचना करण्याचा अधिकार : जयंत पाटील
शरद पवार म्हणाले, तो इमॅच्युर, आता पार्थ पवारांची पहिली प्रतिक्रिया…
‘मीच जाणता, बाकी सारे इमॅच्युअर, असा दावा नाही’ भाजप पदाधिकाऱ्याचा पवारांवर अप्रत्यक्ष निशाणा
पवारांनी नातवाला इमॅच्युअर म्हटलं, आता नितेश राणेंकडून पार्थ पवारांची पाठराखण
एक आजोबा आपल्या नातवाची लायकी जाहीररीत्या काढू शकतात हे पहिल्यांदाच पाहिलं – निलेश राणे.