पार्थ व जय पवार यांनी केली बारामतीतील विकासकामांची पाहणी
पहाटेच्या सुमारास दोन्ही भाऊ ॲक्शन मोडमध्ये

पार्थ व जय पवार यांनी केली बारामतीतील विकासकामांची पाहणी
पहाटेच्या सुमारास दोन्ही भाऊ ॲक्शन मोडमध्ये
बारामती वार्तापत्र
अजित पवारांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांच्या मुलांनी पहाटेच्या सुमारास विकासकामांची पाहणी केली.
आज पहाटे पार्थ पवार व जय पवार यांनी बारामती शहरात सुरू असलेल्या विविध विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी केली.या दौऱ्यात त्यांनी बारामती क्रीडा संकुलासह शहरातील महत्त्वाच्या विकास प्रकल्पांना भेट देत कामांची प्रगती तपासली.
यावेळी त्यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करत कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.नागरिकांच्या सोयी-सुविधांना प्राधान्य देत कोणतीही ढिलाई न करता कामे बारकाईने आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करावीत, असे निर्देश त्यांनी दिले.
पाहणीदरम्यान संबंधित विभागाचे अधिकारी तसेच पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. बारामतीच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.






