स्थानिक

पिंपरीचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीला; भेटीमागे अनेक तर्कवितर्क

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या संमतीनेच बदली करण्यात आल्याच्या चर्चेमुळे थेट पवारांची भेट घेतल्याची चर्चा

पिंपरीचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीला; भेटीमागे अनेक तर्कवितर्क

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या संमतीनेच बदली करण्यात आल्याच्या चर्चेमुळे थेट पवारांची भेट घेतल्याची चर्चा

बारामती वार्तापत्र

पिंपरी-चिंचवडचे बदली झालेले पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश शनिवारी सकाळी बारामतीला ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले. दोहोंमध्ये  दहा ते बारा मिनिटे चर्चाही झाली. भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी चर्चा न करता कृष्ण प्रकाश निघून गेले. तर, पवार नियोजित कोल्हापूर दौऱ्यासाठी रवाना झाले. ” ये मेरी खासगी मुलाकात थी” , असे म्हणत ते गोविंदबागेतून बाहेर पडले.

कृष्ण प्रकाश बारामतीच्या गोविंद बागेत शरद पवारांना साकडं घालायला आलेत, अशी चर्चा आहे.

आठवड्याभराची सुट्टी घेऊन कृष्ण प्रकाश हे परदेशात होते. तेव्हाच गृहविभागाने त्यांची उचलबांगडी केली अन् नवनियुक्त आयुक्त अंकुश शिंदेंनी तातडीनं पिंपरी चिंचवड आयुक्तालयाची सूत्रंही हाती घेतली. पण अद्याप कृष्ण प्रकाशांनी त्यांचा नवा पदभार हाती घेतलेला नाही. कार्यकाळ संपण्यापूर्वीच त्यांची अशी उचलबांगडी केल्याने ते भलतेच नाराज झालेत.

या बदलीला स्थगिती मिळविण्यासाठी ते शरद पवारांच्या दरबारात पोहोचल्याचं बोललं जातंय. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाशांच्या बदलीसोबत ठाणे आणि कोकणातील काही अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या होत्या. त्या बदल्यांना मंत्री एकनाथ शिंदेंनी बारा तासाच्या आतच स्थगिती आणली. तशीच स्थगितीचा सुधारित आदेश आणण्यासाठी कृष्ण प्रकाश खटाटोप करताना दिसतायेत. आता पवारांना साकडं घातल्यानंतर कृष्ण प्रकाशांच्या पदरी काय पडतं हे पहावं लागेल.

भेट झाल्यानंतर कृष्ण प्रकाश यांना भेटीचे कारण विचारलं असता त्यांनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला आहे. कृष्ण प्रकाश भेटून गेल्यानंतर माध्यम प्रतिनिधींनी शरद पवारांशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनीही बोलण्यास नकार दिला.

दरम्यान या भेटीनंतर पवार हे ही कोल्हापूरच्या नियोजित दौऱ्यासाठी निघून गेले. माध्यमांनी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता, आज मला भरपूर कामे आहेत, असे म्हणत त्यांनी माध्यमांशी बोलणे टाळले आणि ते पुढील प्रवासासाठी निघून गेले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button