स्थानिक

पिंपळीत जागतिक महिला दिनानिमित्त सावित्री महिला प्रशिक्षण संस्थेच्या वतीने व्याख्यान व स्त्री सन्मान कार्यक्रम संपन्न

त्याकाळात स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता.

पिंपळीत जागतिक महिला दिनानिमित्त सावित्री महिला प्रशिक्षण संस्थेच्या वतीने व्याख्यान व स्त्री सन्मान कार्यक्रम संपन्न

त्याकाळात स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता.

बारामती वार्तापत्र

सावित्री महिला प्रशिक्षण संस्थेच्या वतीने सावित्री लेकी व्याख्यान माला व स्त्री सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी सामाजिक,राजकीय आणि विविध क्षेत्रात काम करणाऱ्या युवती व महिलांचा सत्कार फळझाड भेट देऊन सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात सरपंच मंगल केसकर व सदस्या स्वाती ढवाण यांचे हस्ते सावित्रीमाई फुले यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून करण्यात आले.

याप्रसंगी सावित्री महिला प्रशिक्षण संस्थेच्या अध्यक्षा स्नेहा थोरात यांनी स्त्री शिक्षणाच्या जनक ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांची जीवनगाथा व्याख्यानातून सांगितली सावित्रीमाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ साली महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात असलेल्या नायगांव येथील गरीब कुटुंबात झाला होता.

त्यांचे वडिलांचे नाव खंडोजी नेवसे होते. १८४० साली नऊ वर्षाच्या वयात त्यांचे लग्न महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी लावण्यात आले. ज्योतीराव फुले हे एक सामाजिक कार्यकर्ता थोर समाजसुधारक होते. ज्यावेळी सावित्रीमाईंचे लग्न झाले तेव्हा त्यांचे काहीही शिक्षण झाले नव्हते. सावित्रीमाईंच्या समाजकार्यात जोतिबांची त्यांना भरपूर साथ मिळाली. त्यांनी सावित्रीमाईंना घरातच शिकवणे सुरू केले. जोतिबांच्या याकार्याला सावित्रीमाईंच्या वडिलांचा विरोध होता, पण तरीही जोतिबांनी सावित्रीमाईंना शिकवणे सुरू ठेवले.

यानंतर त्यांनी सावित्रीमाईंचे एडमिशन एका विद्यालयात केले. समाजातील काही लोक याला विरोध करू लागले. पण त्याकडे लक्ष न देता सावित्रीमाईंनी आपले शिक्षण पूर्ण केले.

शिक्षण पूर्ण झाल्यावर त्या स्त्री शिक्षणासाठी कार्य करायला लागल्या. ज्योतिबा फुलेंच्या सहकार्याने त्यांनी वर्ष १८४८ साली पुण्यातील भिडे वाड्यात मुलींसाठी पहिले विद्यालय सुरू केले. या शाळेत त्याकाळात केवळ ९ मुलींनी प्रवेश घेतला. सावित्रीमाई या देशाच्या प्रथम शिक्षिका व मुख्याध्यापिका ठरल्या.त्याकाळात स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. ज्या वेळी सावित्रीमाई मुलींना शिकवायला रस्त्याने जात असताना लोकांच्या अनिष्ट परंपरेच्या त्रासाला सामोरे जावे लागले होते.तरीही त्यांनी आपले कार्य सुरूच ठेवले.

ज्योतिबा फुले यांना समाजातील इतर लोकांद्वारे धमक्या मिळू लागल्या, या धमक्यांना घाबरून जोतिबांच्या वडिलांनी त्यांना घरातून काढून दिले. तरीही दुःखाने खचून न जाता त्यांचे कार्य सुरूच ठेवले त्यांनी अस्पृश्यता, सतीप्रथा, बालविवाह, विधवा विवाह आशा अनेक जुन्या रूढी परंपरा मोडीत काढत स्त्री शिक्षणाचा पाया रचला.

आज त्यांचे विधेचे माहेर घर पुणे शिक्षण विद्यापीठास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे देण्यात आले.
त्यांच्यामुळे आजची स्त्री शिक्षण घेऊन अनेक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने काम करीत आहेत.

तरी सर्व महिला युवती व विद्यार्थिनीनी स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या सावित्रीमाई फुले, राजमाता जिजाऊ,अहिल्याबाई होळकर,रमाई आंबेडकर,झाशीची राणी,पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी,अंतराळवीर कल्पना चावला,सातव्यांदा संसदरत्न व महासंसदरत्न पुरस्कार मिळवलेल्या बारामतीच्या लोकप्रिय खासदार सुप्रिया सुळे,ऑलिंपिक पदक विजेत्या बॅडमिंटन पिटु पी.व्ही सिंधू, सायना नेहवाल व स्वप्ना बर्मन यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्याला आवड असलेल्या क्षेत्रात नावलौकिक मिळवावा असे व्याख्यानातून मनोगत व्यक्त केले व पुढील महिन्यात महिलांना मोफत शिलाई प्रशिक्षण व हिमोग्लोबिनची तपासणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी सरपंच मंगल केसकर, सदस्या स्वाती ढवाण,अश्विनी बनसोडे,मंगल खिलारे,कोमल टेंबरे,मिनाक्षी देवकाते,निर्मला यादव,ऑपरेटर प्रसन्ना थोरात,सावित्री प्रशिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षा पूनम थोरात, सचिव ज्योत्स्ना गायकवाड, ग्रामसंघाच्या अध्यक्षा सानिया इनामदार,सचिव दिपाली राजगुरू,सुरेखा देवकाते,पिंपळी आरोग्य उपकेंद्र सी.एच.ओ डॉ.दिपाली शिंदे, आरोग्य सेविका नफिसा तांबोळी, पिंपळी पोस्ट क्लार्क प्रमिला कुदळे,पिंपळी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका, अंगणवाडी सेविका-मदतनीस,आशा सेविका, बचतगट अध्यक्ष-सदस्या आणि ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Related Articles

Back to top button