पिंपळी गावचे नवनिर्वाचित उपसरपंच आबासाहेब देवकाते व महाविकास आघाडी पॅनेल ने घेतली राजेंद्र पवार यांची सदिच्छा भेट
कार्यकर्त्यांनी गाव विकासकामासाठी एकत्र येऊन कामे करावीत
पिंपळी गावचे नवनिर्वाचित उपसरपंच आबासाहेब देवकाते व महाविकास आघाडी पॅनेल ने घेतली राजेंद्र पवार यांची सदिच्छा भेट
कार्यकर्त्यांनी गाव विकासकामासाठी एकत्र येऊन कामे करावीत
बारामती वार्तापत्र
बारामती ॲग्रो चे चेअरमन राजेंद्र पवार यांची पिंपळी महाविकास आघाडी पॅनेलच्या वतीने पिंपळी-लिमटेक ग्रामपंचायतीच्या “उपसरपंच पदी” आबासाहेब मल्हारी देवकतेपाटील यांची निवड झाल्याबद्दल सदिच्छा भेट घेऊन पुढील कार्यासाठी आशीर्वाद घेतले.
याप्रसंगी माननीय राजेंद्र पवार यांनी पिंपळी-लिमटेक गावातील व परिसरातील जुन्या आठवणींना उजाळा दिला.जुनी गावे आणि आताची बदलती गावे यांतील फरक सांगून गावात अत्याधुनिक सोयीसुविधांबरोबरच गावातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गाव विकासकामासाठी एकत्र येऊन कामे करावीत आणि गावचा सर्वांगीण विकास करावा असे मार्गदर्शन त्यांनी केले.
संचालक संतोषराव ढवाण पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनाखाली व आपले नेते पवारसाहेब,उपमुख्यमंत्री अजित पवार ,खासदार सुप्रिया सुळे व तालुका अध्यक्ष संभाजीनाना होळकर आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुरु असलेल्या विकास कामांची माहिती दिली व आपण दिलेल्या सूचनांचे पालन करून गावच्या विकासासाठी कटिबद्ध राहू असे आश्वासन दिले.
गाव विकास कामामध्ये सक्रिय सहभाग घेऊन लोकहिताची कामे करू असे मनोगत उपसरपंच आबासाहेब देवकाते पाटील यांनी व्यक्त केले.
यावेळी संचालक सरपंच हरिभाऊ केसकर, उपसरपंच आबासाहेब देवकातेपाटील,अशोकराव ढवाणपाटील,महेश चौधरी, तालुका सोशल मिडिया अध्यक्ष सुनिल बनसोडे, सदस्य राहुल बनकर,अजित थोरात,खंडू खिलारे,लालासाहेब टेंबरे ग्रामस्थ सोना देवकाते पाटील,तुळशीदास केसकर, नवनाथ देवकतेपाटील, शिवाजी देवकातेपाटील,लालासाहेब चांडे,आनंदराव देवकातेपाटील, बाळासाहेब केसकर,दिपक देवकातेपाटील आदी उपस्थित होते.