
पिंपळी मध्ये आरोग्य तपासणी शिबीर संपन्न
आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी प्रत्येकाने दक्ष रहावे
बारामती वार्तापत्र
विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग ग्रामपंचायत पिंपळी आणि एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया यांचे संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिराचे मंगळवार दि.२९ एप्रिल रोजी आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कर्करोग निदान चाचणी, रक्तदाब तपासणी, रक्त परीक्षण ,शुगर टेस्ट, हेल्थ चेकअप, इलेक्ट्रिक कार्डिओग्राफि ईसीजी, गर्भाशय आणि स्त्रीरोग तपासणी , नेत्र तपासणी करणेत आली.
शिबिराचे उद्घाटन पिंपळी लिमटेक ग्रामपंचायत च्या सरपंच स्वाती अशोकराव ढवाण यांनी केले.या प्रसंगी यावेळी ग्रामपंचायतीचे अजित थोरात, मंगल केसकर , अश्विनी बनसोडे,मंगल खिलारे, वैभव पवार,व छत्रपती कारखान्याचे मा. संचालक अशोक ढवाण आणि अशोकराव ढवाण, सुनील बनसोडे ,बलभीम यादव , डॉ दिपाली शिंदे , बाळासाहेब देवकाते व ग्रामसेवक बाळासाहेब भोईटे आणि कमल नयन बजाज अभियांत्रिकी महाविद्यालय चे डॉ. प्रा .लोंढे ,प्रा. सोनवणे, प्रा.डीसले,प्रा. कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
खासदार सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांचे आरोग्य साठी तपासणी घेऊन जर आजार असेल तर लवकर निदान व्याहवे व आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी प्रत्येकाने दक्ष रहावे म्हणून मोफत तपासणी शिबीर घेतले असल्याचे सरपंच स्वाती ढवाण यांनी सांगितले.
आभार फोरम चे सचिन पवार यांनी मानले