पिंपळी-लिमटेक ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी आबासाहेब देवकाते पाटील यांची बिनविरोध निवड
बैठकीत निवडीची घोषणा संचालक संतोषराव ढवाण पाटील यांनी केली.
पिंपळी-लिमटेक ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी आबासाहेब देवकाते पाटील यांची बिनविरोध निवड
बैठकीत निवडीची घोषणा संचालक संतोषराव ढवाण पाटील यांनी केली.
बारामती वार्तापत्र
पिंपळीत ढवाण पाटील यांचे नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आलेल्या महाविकास आघाडी पॅनेल ने सन २०२०-२१ या ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत दणदणीत ९-४ असा विजय संपादित केला होता.
यावेळी महाविकास आघाडीच्या वतीने सरपंच पदी मंगल हरिभाऊ केसकर व उपसरपंच पदी राहुल पोपट बनकर यांची निवड करण्यात आली होती.
त्यावेळी सरपंच व उपसरपंच पदाचा कार्यकाळ ठरविण्यात आला होता.
त्याअनुषंगाने कार्यकाळ पूर्ण होतातच उपसरपंच राहुल बनकर यांनी स्वतःहून राजीनामा दिला होता.
त्यानंतर महाविकास आघाडीच्या बैठकीत पुढील उपसरपंच म्हणून सर्वानुमते आबासाहेब मल्हारी देवकाते पाटील यांची उपसरपंच पदी निवड करण्यात आली.
बैठकीत निवडीची घोषणा संचालक संतोषराव ढवाण पाटील यांनी केली. सदरची निवड बिनविरोध करण्यात आली.
निवडीनंतर महाविकास आघाडी व ढवाण पाटील मिञ परिवाराच्या वतीने जल्लोष करण्यात आला.
उपस्थित सर्वांचे आभार अशोकराव ढवाण पाटील यांनी मानले.
याप्रसंगी बोलताना मतदार राजा व निवडकर्त्या संचालक संतोषराव ढवाण पाटील,रमेशराव ढवाण पाटील,ॲड.सचिन वाघ व महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी यांचे आभार मानून दिलेली जबाबदारी चोख पार पाडेल असे आश्वासन त्यांनी दिले.
मावळते उपसरपंच राहुल बनकर यांनी नवनिर्वाचित उपसरपंच आबासाहेब देवकाते पाटील यांचा पुष्पहार घालून सत्कार केला व त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब भोईटे यांनी कामकाज पाहिले.विरोधी पॅनेल कडून कोणताही फॉर्म न आल्याने ग्रामविकास अधिकारी यांनी आबासाहेब देवकाते पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली.
पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार,खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष संभाजी होळकर यांचे मार्गदर्शनाखाली पिंपळी गावचा झपाट्याने विकास होत आहे आणि असेच सर्वांना सोबत घेऊन गावचा सर्वांगीण विकास करण्यास कटिबद्ध असल्याचे मनोगत संचालक संतोषराव ढवाण पाटील यांनी व्यक्त केले.
दरम्यान पिंपळी गावच्या भगिनी प्राजक्ता श्रीनिवास देवकाते पाटील यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक पिंपळी लिमटेक ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच मंगल केसकर यांनी सत्कार सन्मान केला.
यावेळी संतोषराव ढवाण पाटील, सरपंच मंगल केसकर, मा.उपसरपंच राहुल बनकर,रमेशराव ढवाण पाटील,भाऊसाहेब भिसे, ॲड.सचिन वाघ,सुनिल बनसोडे,पोलीस पाटील मोहन बनकर, अशोकराव ढवाण पाटील,ग्रामपंचायत सदस्य अजित थोरात, वैभव पवार, उमेश पिसाळ, सदस्या स्वाती ढवाण,अश्विनी बनसोडे, मंगल खिलारे, कोमल टेंबरे,मिनाक्षी देवकाते, निर्मला यादव व ग्रामस्थ महेश चौधरी, हरिभाऊ केसकर,महादेव मदने,अशोकराव देवकाते,अशोक थोरात,कालिदास खोमणे,पिटु खिलारे, पप्पू टेंबरे, मारुती बाबर,लालासाहेब चांडे, रघुनाथ देवकाते,आबासो देवकाते, नंदकुमार बाबर,रमेश देवकाते,सोना देवकाते, नवनाथ देवकाते,बापूराव यादव, बापूराव देवकाते,तुळशीदास केसकर,बाळासाहेब केसकर, बापू केसकर,दादासो केसकर,नितीन देवकाते,धुळा ठेंगल, राजेंद्र केसकर,विलास ठेंगल,मच्छिंद्र पिसाळ, शरद चौधरी,संदिप ठेंगल,सुखदेव देवकाते,रामचंद्र देवकाते तसेच ग्रामपंचायत कर्मचारी अनिल बनकर,प्रसन्ना थोरात इतर कर्मचारी आदींसह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.