पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या युवक प्रदेशाध्यक्ष पदी संजय सोनवणे यांची निवड
पक्षश्रेष्ठी प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी दिले नियुक्ती पत्र
पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या युवक प्रदेशाध्यक्ष पदी संजय सोनवणे यांची निवड
पक्षश्रेष्ठी प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी दिले नियुक्ती पत्र
इंदापूर : प्रतिनिधी
पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या युवक प्रदेशाध्यक्ष पदी संजय जगन्नाथ सोनवणे यांची निवड करण्यात आली आहे.शनिवारी (दि.१) पुणे शासकीय विश्रामगृह या ठिकाणी झालेल्या बैठकी दरम्यान पक्षश्रेष्ठी प्रा.जोगेंद्र कवाडे व पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
संजय सोनवणे यांनी या अगोदर पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडीचे अध्यक्षपद भूषविले आहे.त्यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवून जनहिताचे कार्य करून पक्ष मजबुतीसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यामुळे पक्षाकडून त्यांना मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.
निवडी बद्दल बोलताना संजय सोनवणे म्हणाले की,पक्षाचे अध्यक्ष प्रा.जोगेंद्र कवाडे सर यांच्या विचाराने पक्षासाठी आखून दिलेल्या ध्येयधोरणांप्रमाणे तळागाळापर्यंत पक्ष बळकटीसाठी अथकपणे प्रयत्न करून माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी मेहनत करीन.