पुढील पिढीसाठी सामाजिक,ऐतेहासिक कार्यक्रमाची गरज: आकाशजी कंक
नरवीर तानाजी मालुसरे यांचा स्मृतिदिन साजरा
पुढील पिढीसाठी सामाजिक,ऐतेहासिक कार्यक्रमाची गरज: आकाशजी कंक
नरवीर तानाजी मालुसरे यांचा स्मृतिदिन साजरा
बारामती वार्तापत्र
अत्याधुनिक डिजिटल युगामध्ये इतिहास विसरता कामा नये पुढील पिढीला इतिहासाची ओळख निर्माण व्हावी यासाठी सामाजिक व ऐतिहासिक ओळख करून देणाऱ्या कार्यक्रमांची गरज असल्याचे प्रतिपादन सरनोबत सरसेनापती येसाजी कंक यांचे थेट वशंज आकाशजी कंक यांनी केले.
स्वराज्य फौंडेशन व मावळा जवान संघटनेचे बारामती अध्यक्ष प्रदीप ढुके यांचा व मुलगा जन्मॆजयराजे याच्या आठव्या वाढदिवसाच्या निमित्ताने व नरवीर तानाजी मालुसरे यांचा स्मृतिदिन निमित्ताने गड किल्ले संवर्धन स्वयंवसेवक यांचा सन्मान व दिवाळी मधील किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी आकाशजी कंक बोलत होते.
या प्रसंगी शूरवीर जिवाजी महाले यांचे थेट वंशज शिववर्धन महाले सपकाळ व जयदीप महाले सपकाळ व जेष्ठ नागरिक संघ बारामतीचे अध्यक्ष माधव जोशी, अखील भारतीय मराठा महासंघ अध्यक्षा अर्चना सातव ,डॉ दिलीप लोंढे, पत्रकार अमोल यादव नानासाहेब साळवे, योगेश नालंदे , सुहास देशमुख संस्थापक अध्यक्ष दुर्गवेडे बारामतीकर , महेश आहेरकर ,डॉ.दिलीप लोंढे, महेश वीर ,शेखर जाधव,सोमनाथ नाळे,संजय गवळी, नितिन मांडगे, निलेश शेलार, अक्षय गवळी, प्रकाश सातव, मनोज घाडगे मान्यवर उपस्थित होते .
नवीन पिढीने इतिहास विसरू नये या साठी गड, किल्ले या ठिकाणी पालकांनी पाल्याला नेऊन इतिहास सांगावा तरच संस्कृती टिकेल,देश बलवान होईल असेही आकाश कंक यांनी सांगितले.
या वेळी अर्चना सातव,सावळेपाटील,अहेरकर यांनी विचार व्यक्त केले व सदर उपक्रम कौतुकास्पद असल्याचे सांगितले
अश्विन कुमार पत्की यांनी सूत्रसंचालन केले व नानासाहेब साळवे यांनी आभार प्रदर्शन केले
चौकट:
स्वतः चा व मुलाचा वाढदिवस निमित्त इतर खर्च न करता इतिहास संशोधक व स्वराज्य निर्मिती मधील सरदार यांच्या वंशज चा सन्मान ,गड किल्ले संवर्धन साठी मदत, किल्ले स्पर्धे मधील विजेत्यांचा सन्मान करून वाढदिवस साजरा करणारे प्रदीप ढुके व कुटूंब म्हणजे खरे दातृत्व :दत्ताजी नलवडे : इतिहास संशोधक