इंदापूर

आमदार यशवंत माने यांनी केली पावसामुळे नुकसानग्रस्त झालेल्या भागाची पाहणी

शंभर टक्के पंचनामे करण्यास अधिकाऱ्यांना केल्या सूचना

आमदार यशवंत माने यांनी केली पावसामुळे नुकसानग्रस्त झालेल्या भागाची पाहणी

शंभर टक्के पंचनामे करण्यास अधिकाऱ्यांना केल्या सूचना

बारामती वार्तापत्र
मोहोळ विधानसभा मतदार संघातील उत्तर सोलापूर तालुक्यातील तळे हिप्परगा,होनसळ,राळेरास सह अन्य भागात वादळी वाऱ्यासह पावसामुळे नुकसान झालेल्या पिकाची व भागाची शुक्रवार (दि १६) रोजी आमदार यशवंत माने व जेष्ठ नेते जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी भेट देवून पाहणी करून सर्वांचे शंभर टक्के पंचनामे करणेस प्रांताधिकारी,तहसीलदार,गटविकास अधिकारी यांच्यासह संबंधीत विभागास सुचना केल्या.

यावेळी पंचायत समिती सभापती रजनी भडकुंबे,राष्ट्रवादी ओबीसी सेल चे जिल्हाध्यक्ष अविनाश मार्तडे,राष्ट्रवादी चे तालुका अध्यक्ष प्रल्हाद काशीद,युवकचे अध्यक्ष बालाजी पवार, गटविकास अधिकारी शेख मॅडम,मनोज साठे,हरिभाऊ घाडगे,संतोष वाबळे,ओबीसी सेल चे तालुकाध्यक्ष नशीर जहागीरदार सह मंडल अधिकारी,तलाठी,ग्रामसेवक सह शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Back to top button