पुणे चेंबरच्या गुळ व्यापारी असोसिएशनची गुळ उद्योगातील अडचणींबाबत मा.श्री.शरदचंद्रजी पवार साहेब यांची बारामती येथे भेट
अडचणी सोडविण्याबाबत प्रयत्न करू
पुणे चेंबरच्या गुळ व्यापारी असोसिएशनची गुळ उद्योगातील अडचणींबाबत शरदचंद्रजी पवार साहेब यांची बारामती येथे भेट
अडचणी सोडविण्याबाबत प्रयत्न करू
बारामती वार्तापत्र
पुणे चेंबरचे गुळ असोसिएशनचे अध्यक्ष श्री.राजेंद्र गुगळे, माजी अध्यक्ष श्री.मोहन ओसवाल पुणे, श्री.अजित सेठिया, बाबूशेठ म्हसवडकर (निरा), इ. व्यापा-यांनी दि. १७ ऑक्टोबर २०२० रोजी बारामती येथे मा.श्री.शरदचंद्रजी पवारसाहेब, माजी कृषी मंत्री भारत सरकार यांना भेटून गुळ व्यवसायातील अडचणींबाबत व मार्केट कमिटीच्या सेसबाबत चर्चा केली. सदर मिटिंगमध्ये श्री.पवारसाहेब यांनी सर्व अडचणी समजून घेऊन गुरुवार, दि. २२ ऑक्टोबर २०२० रोजी मुंबई येथे यशवंतराव चव्हाण सभागृह येथे गुळ व्यापारी व संबंधित अधिकारी यांची मिटिंग आयोजित केली असल्याचे सांगितले आहे. मुंबई येथील मीटिंगमध्ये या अडचणी सोडविण्याबाबत प्रयत्न करू असे चेंबरच्या व्यापा-यांना साहेबांनी सांगितले. सदर चर्चेच्या वेळी श्री.राजेंद्र गुगळे,श्री.मोहन ओसवाल पुणे, श्री.अजित सेठिया, श्री.बाबूशेठ म्हसवडकर निरा बारामतीचे माजी नगराध्यक्ष व मर्चंट असोसिएशनचे माजी अध्यक्ष श्री.जवाहरशेठ शाह (वाघोलीकर) व बारामतीचे माजी नगराध्यक्ष श्री. सदाशिव (बापू )सातव उपस्थित होते.