लेजटं कॅप कराटे स्पर्धात बारामती कराटे क्लबला 48 पदके
सर्वांना प्रमुख प्रशिक्षक मिननाथ रमेश भोकरे व अनिकेत जवळेकर, सौ.शिवानी काटे कदम यांनी मार्गदर्शन केले.

लेजटं कॅप कराटे स्पर्धात बारामती कराटे क्लबला 48 पदके
सर्वांना प्रमुख प्रशिक्षक मिननाथ रमेश भोकरे व अनिकेत जवळेकर, सौ.शिवानी काटे कदम यांनी मार्गदर्शन केले.
बारामती वार्तापत्र
21 मार्च 2021 रोजी वडगाव शेरी, पुणे येथे नुकत्याच झाल्या कराटे स्पर्धेत विविध जिल्हातील सुमारे 179 स्पर्धकांनी सहभागी घेतला. काता व कुमिते प्रकारामध्ये बारामती कराटे क्लब या संघाने 27 गोल्ड ,15 सिल्वर, 6 ब्रान्झ असें एकूण – 48 पदकासह यास्पर्धेत उत्कृष्ट संघ म्हणून BKC चा सन्मान करण्यात आला स्पर्धेत बारामती कराटे क्लबचें प्रमुख प्रशिक्षक मिननाथ भोकरे यांच्या नेतृत्वाखाली 22 खेळाडूंचा संघ सहभागी झाला होता. या स्पर्धेत सर्वात जास्त वयक्तिक मेडल मिळविणारा विद्यार्थी कु. मंथन भोकरे यानें 3 गोल्ड व 1 सिल्वर मेडलस बेस्ट प्लेर म्हणून प्राविण्य मिळाविले.
यशस्वी विद्यार्थ्यांची नावे व त्याचें पदके पुढील प्रमाणे
उमर खान- 1 गोल्ड,1सिल्वर, रिआंश सिकची-2 गोल्ड, मनस्वी गावडे -2 गोल्ड, शौऱ्यनराजे निंबाळकर -2 गोल्ड, अथर्व भोसले -1 गोल्ड,1सिल्वर, राजन खराडे -1 सिल्वर,1 ब्रान्झ, शिवम गिरे – 2 गोल्ड, श्रावणी गदादे – 2 ब्रान्झ, कुलसुम खान – 2 गोल्ड, मोहित बेलदार – 2 गोल्ड, माही बेलदार- 1गोल्ड,1सिल्वर, अमेय खराडे -1सिल्वर,1 ब्रान्झ, मधुरा मोकाशी -2 सिल्वर, सावी शहा – 2 गोल्ड, गायत्री गावडे -1गोल्ड,1सिल्वर, रम्या बर्डे – 2 ब्रान्झ, रोहन भोसले – 3 गोल्ड, हर्षवर्धन गावडे – 2 सिल्वर, हर्षदा गावडे- 2 सिल्वर, अनिकेत जवळेकर -2 गोल्ड,1सिल्वर, मंथन भोकरे- 3 गोल्ड,1सिल्वर, स्वराज चव्हाण -1गोल्ड,1सिल्वर,
सर्वांना प्रमुख प्रशिक्षक मिननाथ रमेश भोकरे व अनिकेत जवळेकर, सौ.शिवानी काटे कदम यांनी मार्गदर्शन केले.
बारामती कराटे क्लबच्या वतीने सर्व खेळाडूंचे अभिनंदन व पालकांचे आभार