पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वासराव देवकाते यांना राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार
सन २०२० सालचा राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार

पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वासराव देवकाते यांना राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार
सन २०२० सालचा राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार
बारामती वार्तापत्र
परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वासराव देवकाते यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला.
महाराष्ट्राचे राज्यपाल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते हा पुरस्कार मुंबई राजभवन येथे प्रदान करण्यात आला.
भटक्या, वंचित, उपेक्षित समाजातील लोकांसाठी सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल देवकाते यांना सन २०२० सालचा राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार जाहीर झाला होता.
त्याचे वितरण राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, खासदार उदयनराजे भोसले, युवराज यशवंतराव होळकर (इंदोर), खासदार डॉ. विकास महात्मे, चित्रपट दिग्दर्शक केदार शिंदे, सागर फिल्म फाउंडेशनचे
सागर धापटे, आदी उपस्थित होते. देवकाते यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्यासह
मान्यवरांनी अभिनंदन केले.