पुणे

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने प्रतिष्ठेच्या केलेल्या एका जागेवर दणका ,भाजपमध्ये गेलेल्या प्रदीप कंद यांनी सुरेश घुलेंचा पराभव

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रचार सभेवेळी प्रदीप कंद यांना जागा दाखवून देण्याचं आवाहन केलं होतं

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने प्रतिष्ठेच्या केलेल्या एका जागेवर दणका ,भाजपमध्ये गेलेल्या प्रदीप कंद यांनी सुरेश घुलेंचा पराभव

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रचार सभेवेळी प्रदीप कंद यांना जागा दाखवून देण्याचं आवाहन केलं होतं

बारामती वार्तापत्र

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने आघाडी घेतली असली, तरी एका जागेवर दणकाही बसला आहे. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या प्रदीप कंद यांनी सुरेश घुले यांचा पराभव केला. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रचार सभेवेळी प्रदीप कंद यांना जागा दाखवून देण्याचं आवाहन केलं होतं. मात्र या जागेवर सुरेश घुलेंचा 14 मतांनी पराभव झाला.

प्रतिष्ठेची लढत, राष्ट्रवादीचा पराभव

राष्ट्रवादीने प्रतिष्ठेच्या केलेल्या एका जागेवर मात्र पक्षाला दणका बसला आहे. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या प्रदीप कंद यांनी राष्ट्रवादीच्या सुरेश घुलेंचा पराभव केला आहे. सुरेश घुले यांचा 14 मतांनी पराभव झाला. अजित पवारांनी प्रचार सभेत कंद यांना जागा दाखवून देण्याचं आवाहन केलं होतं. मात्र, नेमकी तीच जागा जिंकण्यात राष्ट्रवादी अपयशी ठरली आहे.

कोणी कुठली जागा जिंकली

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवार 73 मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपच्या आबासाहेब गव्हाणे यांचा पराभव केला आहे. तर राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील चांदेरे हे 27 मतांनी विजयी झाले आहेत. चांदेरे यांनी भाजपचे आत्माराम कलाटे यांना पराभूत केलं आहे. तिसरा निकालही राष्ट्रवादीच्या बाजूनेच लागला आहे. हवेलीच्या जागेसाठी झालेल्या मैत्रीपूर्ण लढतीमध्ये राष्ट्रवादीचे विकास दांगट विजयी झाले आहेत.

राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवार आणि राष्ट्रवादीचे नेते सुनील चांदेरे या निवडणुकीत विजयी झाले आहेत. तर हवेलीच्या जागेसाठी झालेल्या मैत्रीपूर्ण लढतीमध्ये राष्ट्रवादीचे विकास दांगट विजयी झाले आहेत. या निवडणुकीत बँक पतसंस्थांसाठीचा ‘क’ गट आणि हवेली मुळशी तालुक्यातील’ अ ‘वर्ग सोसायटी गटातील निकालाबद्दल मोठी उत्सुकता होती.

कोणाकोणाची बिनविरोध निवड

प्रतिस्पर्धी उमेदवारांचा अर्ज बाद झाल्याने भोरमधून काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे , पुरंदर हवेलीचे काँग्रेस आमदार संजय जगताप  बिनविरोध निवडून आले. तर आंबेगाव तालुक्यातून सोसायटी ‘अ’ वर्ग गटातून गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.

उपमुख्यमंत्री अजित पवार , खेड येथील राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील (Dilip Mohite Patil), “ब” वर्गातून राज्यमंत्री दत्तात्रय भरणे , इंदापूर “अ” वर्ग सोसायटी मतदारसंघातून विद्यमान संचालक आप्पासाहेब जगदाळे यांचीही बिनविरोध निवड झाली आहे.

अजितदादांची एकहाती सत्ता

पुणे जिल्हा बॅंक ही राज्यातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य बॅंक आहे. मागील अनेक वर्षांपासून या बॅंकेवर अजित पवार यांचीच एकहाती सत्ता आहे. अजित पवारांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात जिल्हा बॅंकेतून केली होती. 1991 पासून अजित पवार जिल्हा बॅंकेत आहेत. आतापर्यंत त्यांनी सात वेळा जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदाचा मान भूषवला आहे.

शिरुर

अशोक पवार -109
आबासाहेब गव्हाणे- 21

मुळशी

सुनील चांदेरे- 27
आत्माराम कलाटे- 18

हवेली

विकास दांगट- 73
म्हस्के-58

बँकेचे संचालक मंडळ : 21

– अ मतदार संघ (तालुका प्रतिनिधी) : 13

– ब मतदार संघ : 1

– क मतदार संघ : 1

– ड मतदार संघ : 1

– अनुसूचित जाती/जमाती मतदार संघ : 1

– इतर मागासवर्गीय प्रतिनिधी : 1

– विभक्त जाती व प्रजाती : 1

– महिला प्रतिनिधी : 2

Related Articles

Back to top button