पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादीच्या सरचिटणीस राजकारण वैशाली नागवडे ना पडला प्रश्न, “मी कुठं कमी पडले?
वैशाली नागवडे यांनी जिल्हा परिषद निवडणूक लढवीत कूल यांच्या उमेदवाराला जोरदार टक्कर दिली होती
पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादीच्या सरचिटणीस राजकारण वैशाली नागवडे ना पडला प्रश्न, “मी कुठं कमी पडले?
वैशाली नागवडे यांनी जिल्हा परिषद निवडणूक लढवीत कूल यांच्या उमेदवाराला जोरदार टक्कर दिली होती
दौंड;प्रतिनिधी
‘महानंदा’ च्या माजी अध्यक्ष आणि पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादीच्या सरचिटणीस वैशाली नागवडे यांना मी कुठे कमी पडले ? असा प्रश्न पुणे जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या उमेदवार यादीत डावलल्यामुळे पडला आहे.
पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी गुरुवारी रात्री उशिरा जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार जाहीर केले आहे. यात दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांना वगळता दौंड तालुक्यातील सर्वांचे पत्ते कापण्यात आल्याचे दिसून आले. त्यामुळे वैशाली नागवडे यांनी फेसबूक पोस्ट करत मी कुठे कमी पडले? असा संदेश दिला आहे.
वैशाली नागवडे जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या आक्रमक महिला नेता म्हणून ओळखल्या जातात मागील शिवसेना भाजपच्या सत्ताकाळात त्यांनी तत्कालीन सरकारवर व धोरणांवर जोरदार टीका केली होती तसेच राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेल्या चित्रा वाघ यांचा देखील खरपूस समाचार नगवडे यांनी घेतला होता.
भाजपचे आमदार राहुल कूल यांच्या घराच्या जिल्हा परिषद गटात वैशाली नागवडे यांनी जिल्हा परिषद निवडणूक लढवीत कूल यांच्या उमेदवाराला जोरदार टक्कर दिली होती यात वैशाली नागवडे यांचा पराभव झाला होता.
त्यानंतर लोकसभा निवडणुकीत दौंड तालुक्यातील उमेदवार असतानाही स्थानिक उमेदवार कांचन कुल यांचे मताधिक्य रोखण्यात यश मिळवून सुप्रिया सुळे यांचा आक्रमक प्रचार केला होता. त्यांनतर वैशाली नागवडे यांना योग्य पद देऊन सन्मान केला जाईल असे वाटतं असताना पक्षाने जिल्हा बँकेच्या निवडणुकीत डावलल्यामुळे नागवडे समर्थक नाराज असल्याचे बोललो जात आहे.
मी कुठं कमी पडले याचे आत्मपरीक्षण मी करत असून यापुढील काळात आणखी जोमाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.