पुणे जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी जाहीर
खासदार अनिल देसाई यांनी प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती कळविली
शिवसेना पुणे जिल्ह्यातील पदाधिकारी नियुक्त्या जाहीर
खासदार अनिल देसाई यांनी प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती कळविली
बारामती वार्तापत्र रिपोर्ट
शिवसेना पक्षप्रमुख,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पुणे जिल्हयातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून शिवसेना सचिव, खासदार अनिल देसाई यांनी प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती कळविली आहे.
पदाधिकाऱ्याचे पद, नाव आणि कार्यक्षेत्र पुढीलप्रमाणे जिल्हा सहसंपर्कप्रमुख : अशोक खांडेभराड (खेड, शिरूर), राजेंद्र काळे (भोर, पुरंदर, बारामती), राम मच्छिंद्र गावडे (दौंड, इंदापूर), योगेश बाबर (पिंपरी, चिंचवड, भोसरी).जिल्हाप्रमुख : शरद सोनावणे (जुन्नर, आंबेगाव), माऊली कटके (शिरूर, खेड-आळंदी), विजय देशमुख (भोसरी, हडपसर), महेश पासलकर (दौंड, इंदापूर), रमेश कोंडे (बारामती, खडकवासला), बाळासाहेब चांदेरे (पुरंदर, भोर), गजानन चिंचवडे (मावळ, चिंचवड, पिंपरी),गजानन थरकुडे (शिवाजीनगर, कोथरूड, पर्वती), संजय मोरे (पुणे कॅण्टोन्मेंट, कसबा पेठ, वडगाव शेरी). उपजिल्हाप्रमुख : शरद हुलावळे (मावळ).शहरप्रमुख : अॅड. सचिन भोसले (पिंपरी-चिंचवड, भोसरी), बाळासाहेब फाटक (लोणावळा).