‘पुणे तिथे काय उणे’ असं उगाच म्हटलं जात नाही. गजबजलेल्या रस्त्यावर मद्यधुंद तरुणीचा धिंगाणा, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
ही तरुणी नेमकी कोण आहे याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.
![](https://baramatiwarta.in/wp-content/uploads/2021/08/1806c3f4-a704-440a-b91c-7299207ac44e.jpg)
‘पुणे तिथे काय उणे’ असं उगाच म्हटलं जात नाही. गजबजलेल्या रस्त्यावर मद्यधुंद तरुणीचा धिंगाणा, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
ही तरुणी नेमकी कोण आहे याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.
पुणे – बारामती वार्तापत्र
‘पुणे तिथे काय उणे’ असं उगाच म्हटलं जात नाही. त्याच कारण असं की, एका मद्यधुंद झालेल्या तरुणीनेरस्त्यावर तुफान धिंगाणा घातला. नुसता धिंगाणाच घातला नाही तर रस्त्यावर वाहतूक सुरू असताना या तरुणीने रस्त्यावर लोटांगण घातले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
त्याचं झालं असं की, टिळक रस्त्यावरील हिराबाग चौकात हा प्रकार घडला. एका झिंगाट झालेली तरुणी रस्त्यावर धिंगाणा घालत होती. मद्यधुंद अवस्थेतील या तरुणीने रस्त्यावर झोपून वाहतूक अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी जोरजोरात बडबडत होती. एवढंच नाहीतर समोरून येणाऱ्या कारचालकाला आपल्या अंगावर गाडी घालण्याची विनंतीची या ताईंनी केली.
या तरुणीचा प्रताप पाहून पुणेकर चांगले हैराण झाले. काही तरुण या तरुणीचा व्हिडीओ रेकॉर्ड करत होते. तर काही जणांनी या तरुणीला हटवण्याचा प्रयत्न केला. पण, बाई ऐकताल तर ना.
मग सजग पुणेकरांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या तरुणीची समजूत काढून तिला बाजूला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती पोलिसांचेही ऐकण्याच्या अवस्थेत नव्हती. अखेर कसंबसं पोलिसांनी या तरुणीला ताब्यात घेतलं आणि पोलीस स्टेशनला घेऊन गेले.