पुणे-सोलापूर महामार्गावर दरोड्याच्या तयारीत असलेल्या 3 दरोडेखोरांना दौंड पोलिसांनी जेरबंद
तर रात्रीच्या अंधारात एकूण 4 दरोडेखोर पळूण जाण्यात यशस्वी ठरले आहेत.
पुणे-सोलापूर महामार्गावर दरोड्याच्या तयारीत असलेल्या 3 दरोडेखोरांना दौंड पोलिसांनी जेरबंद
तर रात्रीच्या अंधारात एकूण 4 दरोडेखोर पळूण जाण्यात यशस्वी ठरले आहेत.
क्राईम; बारामती वार्तापत्र
पुणे-सोलापूर महामार्गावर दरोड्याच्या तयारीत असलेल्या 3 दरोडेखोरांना दौंड पोलिसांनी जेरबंद केलंय. तर रात्रीच्या अंधारात एकूण 4 दरोडेखोर पळूण जाण्यात यशस्वी ठरले आहेत. अटक केलेल्या आरोपींचा दौंड पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पाठलाग केला. मुसक्या आवळलेले सर्व दरोडेखोर उसामध्ये दबा धरून बसले होते. पोलीस आणि दरोडेखोरांमध्ये तब्बल तीन तास थरार सुरु होता.
पुलाजवळ आरोपी दरोडा टाकण्यासाठी लपले असल्याची माहिती मिळाली
मिळालेल्या माहितीनुसार पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील दौंड तालुक्यातील खडकी गावच्या हद्दीत एकूण सात दरोडेखोर दरोडा टाकण्याच्या तयारीत होते. त्यासाठीची सर्व तयारी त्यांनी केली होती. मात्र, खबऱ्यांच्या माध्यमातून पोलिसांना या दरोड्याची माहिती मिळाली. खडकी गावच्या हद्दीतील शितोळे वस्ती येथील पुलाजवळ आरोपी दरोडा टाकण्यासाठी लपले होते. त्यानंतर दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दरोडेखोरांना पकडण्यासाठी सापळा रचला. पोलीस दिसताच सातही दरोडेखोरांनी तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी यापैकी तीन दरोडेखारांना पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पाठलाग करून जेरबंद केलं
4 आरोपी अंधाराचा फायदा घेत पसार झाले
रात्रीच्या अंधारात एकूण सात दरोडेखोर उसाच्या शेतामध्ये चिखलात दबा धरून बसले होते. या तीन आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले. तर 4 आरोपी अंधाराचा फायदा घेत पसार झाले. अटक करण्यात आलेल्या दरोडेखोरांची पोलीस कसून चौकशी करत आहेत. त्यांच्या चौकशीतून आणखी काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे.