पुण्यातील अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालयातर्फे बारामतीमध्ये मोफत आरोग्य शिबीर
रक्तदाब, बोन मिनरल डेन्सिटी, बॉडी अॅनेलिसिस आदी तपासण्या करता येणार आहे.
पुण्यातील अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालयातर्फे बारामतीमध्ये मोफत आरोग्य शिबीर
रक्तदाब, बोन मिनरल डेन्सिटी, बॉडी अॅनेलिसिस आदी तपासण्या करता येणार आहे.
बारामती वार्तापत्र,
पुणे – पुण्यातील अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पीटलच्या वतीने बारामती येथे मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले. गुरुवारी १२ मे रोजी ११ ते २ वाजेपर्यंत बारामती येथील सिव्हर ज्युबिली हॉस्पीटल येथे आयोजन करण्यात आले आले.
लठ्ठपणा व मधुमेह शस्त्रक्रिया, हर्निया, पित्ताशयातील खडे, पोटाच्या शस्रक्रिया, सांधेदुखी, गुडघेदुखी,पाठ व कंबरदुखी अशा समस्यांनी त्रस्त नागरिकांना याठिकाणी तज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. याठिकाणी लेप्रोस्कोपीक आणि बॅरीयाट्रीक सर्जन डॉ केदार पाटील,ऑर्थोपेडीक सर्जन डॉ सुजित कद्रेकर यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेता येणार आहे. या शिबीरात डॉक्टरांचा सल्ला, रक्तातील साखरेची पातळी, रक्तदाब, बोन मिनरल डेन्सिटी, बॉडी अॅनेलिसिस आदी तपासण्या करता येणार आहे. याकरिता पुर्व नोंदणी आवश्यक आहे.