पुणे

पुण्यातील येरवडा परिसरातील शास्त्रीनगर भागात मॉलचा स्लॅब कोसळून 5 कामगारांचा मृत्यू

जखमींवर ससून रुग्णालयात उपचार सुरू असून हे सर्व कामगार परराज्यातील असल्याची माहिती येरवडा पोलिसांनी दिली आहे.

पुण्यातील येरवडा परिसरातील शास्त्रीनगर भागात मॉलचा स्लॅब कोसळून 5 कामगारांचा मृत्यू

जखमींवर ससून रुग्णालयात उपचार सुरू असून हे सर्व कामगार परराज्यातील असल्याची माहिती येरवडा पोलिसांनी दिली आहे.

पुणे :प्रतिनिधी

पुण्यातील येरवडा परिसरातील शास्त्रीनगर भागात असलेल्या एका अंडर-कन्स्ट्रक्शन मॉलचा स्लॅब कोसळून पाच कामगारांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रात्री साडेदहा ते सव्वा अकराच्या दरम्यान ही घटना घडली असून साईट वरती स्लॅब साठी तयार करण्यात आलेली लोखंडी जाळी अचानक निसटली आणि त्याखाली काम करणाऱ्या कामगारांना आपला जीव गमवावा लागला आहे.
या साईटवर रात्री उशिरा देखील काम सुरूच होत घटना घडली तेंव्हा एकूण 10 मजूर तिथं काम करत होते त्यातील 5 जण या घटनेत मृत्युमुखी पडले असून उर्वरती 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. या साऱ्या घटनेची माहिती मिळताच अग्निशामन दल आणि पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाल होतं, सध्या मृत्यूंची ओळख पटवण्याचा काम पोलिस प्रशासन करत असून जखमींना ससून रुग्णालयात नेले असल्याची माहिती मिळत आहे.
माञ या घटनेनंतर काही प्रश्न देखील उपस्थित होत आहेत एवढ्या रात्री या साईटवर काम कसं काय चालू होतं? या मॉलच्या बांधकाम वेळेस सुरक्षतेची योग्य ती जबाबदारी घेतली आहे का? एवढ्या रात्री देखील काम सुरू करायला परमिशन नव्हती दिली कुणी?
या साऱ्या प्रश्नांसह या कामगारांची जबाबदारी नेमकी कोण घेणार हे देखील महत्वाचं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button