पुण्यातील शिवसेनेचे उपनेते रघुनाथ कुचिक यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल
एका 24 वर्षीय तरुणीनं कुचिक यांच्या विरोधात तक्रार दिली होती.
पुण्यातील शिवसेनेचे उपनेते रघुनाथ कुचिक यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल
एका 24 वर्षीय तरुणीनं कुचिक यांच्या विरोधात तक्रार दिली होती.
क्राईम;बारामती वार्तापत्र
शिवसेनेचे उपनेते रघुनाथ कुचिक यांच्यावर पुण्यातल्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका 24 वर्षीय तरुणीनं कुचिक यांच्या विरोधात तक्रार दिली होती. या तक्रारीवरुनच पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लग्नाचं आमिष दाखवून 24 वर्षीय तरुणीसोबत शारीरिक संबंध ठेवले. इतकेच नाही तर ती तरुणी गरोदर झाल्यावर तिचा जबरदस्तीने गर्भपात केल्याचाही गंभीर आरोप रघुनाथ कुचिक यांच्यावर करण्यात आला आहे.
पीडित तरुणी ही 24 वर्षीय आहे. या तरुणीने रघुनाथ कुचिक यांच्याविरोधात पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केला आहे. आपल्या तक्रारीत पीडित तरुणीने आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितला आहे. नोव्हेंबर 2020 ते फेब्रुवारी 2022 या काळात आपल्यासोबत हा सर्व प्रकार घडला असल्याचं तरुणीने तक्रारीत म्हटलं आहे.
आपल्याला लग्नाचं आमिष दाखवत वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले. तसेच आपण गरोदर असल्याचं कळल्यानंतर जीवे मारण्याची धमकी देत जबरदस्तीने गर्भपात करुन घेतला असा आरोपीही पीडित तरुणीने केला आहे.
गर्भपात केल्याचं तसेच आपल्या संबंधांबाबत कुणालाही सांगितलं तर तुला जीवे मारेल अशी धमकी देण्यात आल्याचंही पीडित तरुणीने म्हटलं आहे. पीडित तरुणीने या प्रकरणात पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पीडित तरुणीच्या तक्रारीनंतर पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुणे पोलीस अधिक तपास करत आहेत.
गेल्या दोन वर्षांपासून लग्नाचं आमिष दाखवण्यात येत होतं. लग्नाचं आमिष दाखवत आपल्यावर पुणे, गोव्यातील विविध ठिकाणी शारीरिक संबंध ठेवले असंही पीडित तरुणीने म्हटलं आहे. या संदर्भात अद्याप शिवसेनेचे उपनेते रघुनाथ कुचिक यांची कुठलीही प्रतिक्रिया समोर आलेली नाहीये.
या प्रकरणी पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पोलिसांनी आयपीसी 376, 313, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. मात्र, एका ज्येष्ठ नेत्याच्या विरोधात बलात्काराची तक्रार दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.