क्राईम रिपोर्ट

बारामती शहर पोलीसांकडून गावठी पिस्तूलासह दहशत माजवणारा संशयित जेरबंद – वेळीच घेतलेल्या कारवाईमुळे गंभीर गुन्हा टळला

चार जिवंत काडतूस आणि मॅगझिन असा मुद्देमाल मिळून आला.

बारामती शहर पोलीसांकडून गावठी पिस्तूलासह दहशत माजवणारा संशयित जेरबंद – वेळीच घेतलेल्या कारवाईमुळे गंभीर गुन्हा टळला

चार जिवंत काडतूस आणि मॅगझिन असा मुद्देमाल मिळून आला.

बारामती वार्तापत्र,

बारामती शहरात नगरपालिका निवडणूक 2025 च्या आचारसंहितेच्या कालावधीत बेकायदेशीर शस्त्र बाळगून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका संशयिताला बारामती शहर पोलिसांनी वेगवान व प्रभावी कारवाईत जेरबंद केले आहे.

दिनांक 28/11/2025 रोजी गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक श्री सतीश राऊत, पोलीस अंमलदार अमीर शेख, दत्तात्रय मदने व इतर पथक अमराई भागात पेट्रोलिंग करत असताना, जनहित प्रतिष्ठान शाळेजवळ एक इसम बेकायदेशीर शस्त्रासह फिरत असल्याची गुप्त माहिती पो.उपनिरीक्षक राऊत यांना मिळाली. त्यांनी तत्काळ सदर माहिती प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांना कळवली. मिळालेल्या आदेशानुसार पथकाने सापळा रचून संशयितास ताब्यात घेतले.

पंचासमक्ष घेतलेल्या अंगझडतीत संशयिताकडे एक गावठी पिस्तूल, चार जिवंत काडतूस आणि मॅगझिन असा मुद्देमाल मिळून आला.
त्याची ओळख प्रदीप सुरेश नकाते (वय 27 वर्षे, रा. ऋतुसृष्टी अपार्टमेंट, प्रगतीनगर, बारामती) अशी करण्यात आली.

या प्रकरणी बारामती शहर पोलीस स्टेशन येथे आर्म अॅक्ट 1959 कलम 3(25), भारतीय न्याय संहिता कलम 3(5), मुंबई पोलीस अधिनियम 1951 कलम 135 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

माननीय न्यायालयाने आरोपीस पोलीस कोठडी दिली असून चौकशीदरम्यान आरोपीने शस्त्र कोठून मिळविले यासंबंधीची माहिती पोलिसांना दिली आहे. शस्त्र पुरवठादाराचे तपास पथकाकडून सक्रियपणे शोधकार्य सुरू असून त्यास लवकरच ताब्यात घेतले जाणार आहे.

अटक आरोपीने शस्त्र कोणत्या हेतूने जवळ बाळगले होते याबाबतही सखोल तपास पोलीस उपनिरीक्षक सतीश राऊत यांच्या मार्फत मा. पोलीस अधीक्षक श्री गिल साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक श्री रमेश चोपडे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री गणेश बिरादार, पोलीस उपविभागीय अधिकारी श्री सुदर्शन राठोड तसेच प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

बेकायदा शस्त्रे बाळगून दहशत निर्माण करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध पोलिसांचा कठोर कारवाईचा इशारा
सदर प्रकरणाचा संदर्भ देत प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांनी आवाहन केले आहे की,
“बारामती शहरात कुणीही बेकायदेशीर शस्त्रे बाळगत असल्याची माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.”

Back to top button