पुण्यात एका पोलीस उप निरीक्षकाने पब मालकाकडून सुट्टीवर असताना वर्दी घालून पैसे वसुली करणे पडले भारी
मिलन कुरकुटे असं निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचं नाव आहे.
पुण्यात एका पोलीस उप निरीक्षकाने पब मालकाकडून सुट्टीवर असताना वर्दी घालून पैसे वसुली करणे पडले भारी
मिलन कुरकुटे असं निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचं नाव आहे.
क्राईम;बारामती वार्तापत्र
पुण्यात एका पोलीस उप निरीक्षकाने पब मालकाकडून पैसे वसूल करण्याचा प्रयत्न केला. धक्कादायक म्हणजे, सुट्टीवर असताना वर्दी घालून या पोलिसाने वसुली केली आहे. त्यामुळे त्याला घरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
पुण्यातील मुंढवा येथील कार्णीवल पबमध्ये ही घटना घडली आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड पोलिसांची प्रतिमा मलीन केल्याचा ठपका ठेवत एका पोलीस उपनिरीक्षकाला पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी निलंबित केलं आहे. मिलन कुरकुटे असं निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचं नाव आहे.
मिलन कुरकुटेने वैद्यकीय रजा घेतलेली असताना वर्दी घातलेल्या स्थितीत एका कार्णीवल पबमध्ये जाऊन मालक आणि मॅनेजरशी हुज्जत घालत पैशाची मागणी केल्या प्रकरणी तक्रार दाखल झाली होती. त्याच्याविरोधात तक्रारीची दखल घेत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी कुरकुटेला तात्काळ निलंबित केलं.
विशेष म्हणजे, उच्चशिक्षित आणि अतिशय तरुण वयात पोलीस दलात दाखल झालेला कुरकुटे प्रशिक्षण काळात प्राविण्य मिळविनारा हुशार अधिकारी म्हणून पोलीस दलातील वरिष्ठांच्या शाब्बासकीस पात्र ठरला होता. मात्र हाच कुरकुटे मागील वर्षी एका प्रकरणात लाच घेतांना रंगेहात पकडला गेला होता आणि त्यावेळीही त्याला निलंबित करण्यात आलं होतं.
काही दिवसांनी तो पुन्हा पोलीस खात्यात रुजू झाला मात्र पुन्हा एकदा तो पैशे मागतानाच सापडल्याने त्याच्या कृत्याला पोलीस आयुक्तांनी पाठीशी न घालता तात्काळ निलंबित केलं. मात्र, शिस्तप्रिय आणि खमके अधिकारी असलेल्या कृष्ण प्रकाश यांच्या नेतृत्वातील पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या काळ्या कृत्यांनी खात्याची प्रतिमा मलिन केल्याची ही 15 पंधरा दिवसातली दुसरी घटना आहे.
या आधी पिंपरी चिंचवड पोलीस दलातील गुन्हे शाखा चार मध्ये कार्यरत असलेला एक कर्मचारी चक्क मोबाईल फोनचे सीडीआर रिपोर्ट आरोपीला देत असल्याचे स्पष्ट झाल्याने त्याला निलंबित करण्यात आलं होतं. लक्ष्मण नावजी आढारी, असे निलंबित केल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव होतं. एका आरोपीची पत्नी ही चाकण पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिसाच्या संपर्कात असल्याचा संशय संबंधित आरोपीला होता. त्यामुळे त्याबाबत खात्री करून घेण्यासाठी संबंधित आरोपीने पोलीस कर्मचारी लक्ष्मण आढारी यांच्याशी संपर्क साधला.
आरोपीने त्याच्या पत्नीच्या मोबाईलचा सीडीआर काढून देण्याचे सांगितले. त्यानुसार, लक्ष्मण आढारी यांनी आरोपीला त्याच्या पत्नीच्या मोबाईलचा सीडीआर काढून दिला. संबंधित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यावेळी चौकशी दरम्यान त्याच्या मोबाईलमध्ये त्याच्या पत्नीच्या मोबाईलचा सीडीआर मिळून आला. त्याबाबत चौकशी केली असता, लक्ष्मण आढारी यांनी सीडीआर काढून दिल्याचे आरोपीने पोलिसांना सांगितले. त्यामुळे पोलीस आयुक्त यांनी लक्ष्मण आढारी यांच्या निलंबन केलं होतं.