पुणे

पुण्यात खळबळ! दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये 10 जणांचा बुडून मृत्यू

भाटघर धरणात बुडालेले 5 जण एकाच कुटुंबातले

पुण्यात खळबळ! दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये 10 जणांचा बुडून मृत्यू

भाटघर धरणात बुडालेले 5 जण एकाच कुटुंबातले

पुणे; प्रतिनिधी

राजगुरुनगरमध्ये चासकमान धरणात पोहायला गेलेली चार मुले पाण्यात बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कृष्णामुर्ती फाऊंडेशनच्या सह्याद्री स्कुलची चार मुलं पाण्यात बुडाल्याची माहिती समोर आली आहे. चारही मुलांना बाहेर काढण्यात यश आलं असून चाकण येथील युनिकेअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र त्यानंतर ही चारही मुलं मयत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

सह्याद्री स्कुलचे हे सर्व विद्यार्थी असल्यानं आता शाळा प्रशासनावर देखील प्रश्न उपस्थित होत आहेत. सह्याद्री स्कुलमधुन बाहेर पडता येत नसतानाही मुलं पोहायला गेली कशी असा सवाल निर्माण होतोय. तसंच या सर्व घटनेला स्कुल प्रशासनाच्या गलथान कारभार जबाबदार असल्याचं म्हटल्या जातंय.

भाटघर धरणात 5 तरुणी बुडाल्या

भाटघर जवाळील नरेगावात पुण्याहून आलेल्या तरुणी पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. खुशबू लंकेश रजपूत, मनीषा लखन रजपूत, चांदणी शक्ती रजपूत, पूनम संदीप रजपूत आणि मोनीका रोहीत चव्हाण असं धरणात बुडालेल्यांची नावं आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram