पुणे

पुण्यात पुढील सात दिवस मिनी लॉकडाऊन, वाचा संपूर्ण नियमावली

पुण्यातील वाढती कोरोना रुग्णांची स्थिती पाहता कडक निर्बंध लादले गेले आहेत. विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी माध्यमांशी संवाद साधत पुण्यातील मिनी लॉकडाऊनची नियमावली सांगितली.

पुण्यात पुढील सात दिवस मिनी लॉकडाऊन, वाचा संपूर्ण नियमावली

पुण्यातील वाढती कोरोना रुग्णांची स्थिती पाहता कडक निर्बंध लादले गेले आहेत. विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी माध्यमांशी संवाद साधत पुण्यातील मिनी लॉकडाऊनची नियमावली सांगितली.

पुणे :बारामती वार्तापत्र रिपोर्ट

पुण्यात कोरोना रुग्णांचा उद्रेक झालेला आहे. दररोज जवळपास चार ते साडे चार हजार रुग्णसंख्या मिळत आहे. त्यामुळे पुण्यातील रुग्णालयांतील बेड्सची समस्या देखील उद्भवू लागली आहे. आज उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली. त्यानुसार विभागीय आयुक्त सौरभ राव  यांनी माध्यमांशी संवाद साधत पुण्यातील मिनी लॉकडाऊनची  नियमावली सांगितली.

पुण्यातलं मिनी लॉकडाऊन कसं असेल?

लॉकडाऊन कुणालाच नको आहे मात्र वाढणारी रुग्णसंख्या पाहता कडक निर्बंध तर लादावे लागणार आहेत. याच पार्श्वभूमीवर पुण्यात पुढील काही दिवसांसाठी काही नियम आखले आखले आहेत. नव्या नियमांनुसार सार्वजनिक बससेवा, धार्मिक स्थळं, हॉटेल, रेस्टॉरंट सेवा पुढील सात दिवसांसाठी बंद राहतील. उद्यापासून पुढील सात दिवस हे नियम लागू राहतील.

दिवसभर जमावबंदी, संध्याकाळी सहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी

संध्याकाळी सहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी असेल. केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहतील. दिवसभर जमावबंदी असणार आहे.

हॉटेल, रेस्टॉरंट, धार्मिक स्थळं बंद…

सर्व हॉटेल, रेस्टाँरट, बार हे पुढील सात दिवसांसाठी बंद राहील. मात्र पार्सल सेवा सुरु राहील. मॉल आणि सिनेमा हॉल 7 दिवसांसाठी बंद राहतील. तसंच धार्मिक स्थळं देखील पुढील 7 दिवसांसाठी बंद असतील.

पुण्यातील  बससेवा बंद

पुण्यातील बससेवा पुढील 7 दिवस बंद राहणार आहे. केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहे. तसंच आठवडे बाजारही बंद राहणार आहे.

लग्न, आणि अंत्यसंस्कारांना परवानगी, बाकी कार्यक्रमांना नाही…

लग्न, आणि अंत्यसंस्कार सोडून कोणतेही सामाजिक, राजकीय कार्यक्रम होणार नाहीत, हा देखईल मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

जिम सुरु राहणार

पुण्यातील जीम सुरु राहणार आहे. जीम बंद करण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही.

दहावी, बारावी आणि एमपीएससी परीक्षा नियोजित वेळेत, शाळा महाविद्यालय 30 एप्रिल पर्यंत बंद

दहावी, बारावी आणि एमपीएससी परीक्षा नियोजित वेळेत होणार आहेत. तसंच शहरातील शाळा महाविद्यालय 30 एप्रिल बंद राहणार

पुण्याची परिस्थिती गंभीर

पुणे विभागाचे विभागीय आयुक्त सौरभ राव म्हणाले, “पुण्यातील परिस्थिती बिकट होत चालली आहे. पॉझिटिव्ह रेट 32 टक्क्यांपेक्षा जास्त झालाय. रोजचा पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 8 हजारांवर गेला आहे. वाढती कोरोना रुग्ण संख्या चिंताजनक आहे. रुग्ण वाढले तर खासगी हॉस्पिटलला कोरोना हॉस्पिटल करावे लागेल. पेशंट असे वाढत राहिले तर काही हॉस्पिटल हे 100 टक्के कोरोना हॉस्पिटल करावे लागतील”.

“बेडची संख्या वाढवणार आहे,टेस्टिंग वाढवलं जाईल. पुण्यामध्ये इतर जिल्ह्यातूनही रुग्ण उपचारासाठी येत आहेत. लसीकरणाचा वेग वाढवणार. मागील दहा दिवसांत राज्यात पुणे शहरात सर्वाधिक लसीकरण झाले. पुढील दोन दिवसात 75 ते 80 हजार लसीकरणाचे उद्दिष्ट आहे. येत्या 3 ते 4 दिवसात 1 लाख लसीकरणाचे उद्दिष्ट आहे. पुणे विभागात कोल्हापूर वगळता सांगली, सातारा, सोलापूरमध्ये रुग्णसंख्या वाढ चिंतेचा विषय आहे. सुपरस्प्रेडरची आठवड्यातून एकदा टेस्ट बंधनकारक आहे.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!