पुण्यात लॉकडाऊन नाही, मात्र कडक निर्बंध लागू करणार उपमुख्यमंत्री अजित पवार
सध्या पुण्यात 62 कंटेन्मेंट झोन आहेत.

पुण्यात लॉकडाऊन नाही, मात्र कडक निर्बंध लागू करणार उपमुख्यमंत्री अजित पवार
सध्या पुण्यात 62 कंटेन्मेंट झोन आहेत.
पुणे :बारामती वार्तापत्र रिपोर्ट
गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात कड़क निर्बंध घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यात आज उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठक पार पडली. या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.
पुण्यात लॉकडाऊन लागू केला जाणार नाही. पण कडक निर्बंध घालण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच शाळा 21 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश घेण्यात आले आहेत. तसेच उद्यानं एकवेळ बंद राहणार आहे. त्याशिवाय हॉटेल आणि मॉल रात्री 10 पर्यंतच सुरू राहणार आहे, असे निर्णय आज झालेल्या बैठकीत घेण्यात आले आहेत.
पुण्यात अजित पवारांच्या उपस्थितीत बैठक
पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थिती कोरोना आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्त उपस्थितीत होते. या बैठकीदरम्यान पुणे शहर, पुणे जिल्हा आणि पिंपरी चिंचवडमधील कोरोनाचा आढावा घेतला गेला. या ठिकाणी किती कोरोना रुग्ण आहेत, मृत्यू किती आहे? याचा आढावा घेतला जाईल. सध्या पुण्यात 62 कंटेन्मेंट झोन आहेत. या झोनमध्ये कडक निर्बंध लावण्यात येणार आहे. पुणे पालिकेच्या विभागीय आयुक्त कार्यालयात ही बैठक पार पडली.
विशेष म्हणजे या बैठकीपूर्वी भाजप नेते चंद्रकात पाटील यांनी अजित पवारांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्या दोघांमध्ये लॉकडाऊन, वाढता कोरोना या विषयांवर चर्चा केल्याचे बोललं जात आहे.
पुण्यात काय सुरु, काय बंद?
💠पुण्यात लॉकडाऊन नाही
💠पुणे शहरात रात्रीची संचारबंदी
💠पुण्यात रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत संचारबंदी लागू
💠लग्न सभारंभ आणि दशक्रिया विधीला 50 पेक्षा जास्त लोकांना परवानगी
💠31 मार्चपर्यंत जिल्ह्यातील सर्व शाळा बंद
💠हॉटेल आणि मॉल रात्री 10 पर्यंत सुरु राहणार
💠उद्यान एकवेळ बंद राहणार
पुण्यातील सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश
पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात लॉकडाऊन लागू करण्यात येणार नाही. मात्र कडक निर्बंध घालण्यात येणार आहे. येत्या 31 मार्चपर्यंत जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच उद्यान एकवेळ बंद राहणार आहेत. हॉटेल आणि मॉल रात्री 10 पर्यंत सुरु राहणार आहेत.
तसेच लग्न सभारंभ आणि दशक्रिया विधीला 50 पेक्षा जास्त लोकांना परवानगी दिली जाणार नाही. पुणे शहरात रात्रीची संचारबंदी लागू केली जाणार आहे. रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत संचारबंदी लागू असणार आहे. अत्यावश्यक सेवा वगळून संचारबंदी असणार आहे. पुण्यात लॉकडाऊन होण्याची भूमिका कोणाचीही नाही, असे सौरभ राव म्हणाले.