पुण्यात वाढत असलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा बंद, नवे कडक निर्बंध
मास्क न घातल्यास उद्यापासून दंडात्मक कारवाई होणार असून, विनामास्क फिरणाऱ्यांकडून 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात येणार आहे.
पुण्यात वाढत असलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा बंद, नवे कडक निर्बंध
मास्क न घातल्यास उद्यापासून दंडात्मक कारवाई होणार असून, विनामास्क फिरणाऱ्यांकडून 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात येणार आहे.
पुणे : प्रतिनिधी
राज्यासह पुण्यात वाढत असलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील कोरोना आढावा बैठकीच आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत शहरातील पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार हे बैठकीनंतर जाहीर करतील. या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
पुण्यात कोरोनाचा विस्फोट
राज्यासह पुणे शहरातही दिवसंदिवस कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना ( Corona patients increased in pune ) दिसत आहे. एकीकडे राज्यात ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत आहेत तर दुसरीकडे कोरोनाची देखील रुग्णसंख्येमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे पुन्हा चिंतेचे वातावरण निर्माण झाला आहे. पुणे शहरात आज 1104 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे. गेल्या दोन महिन्यातील सर्वाधिक मोठी कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. शहरात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांमुळे चिंतेच वातावरण निर्माण झालं आहे.
शहरात दिवसेदिवस वाढत आहे रुग्णसंख्या –
पुणे शहरात दिवसंदिवस कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे.शहरात गेल्या काही महिन्यापासून कोरोनाचे रुग्ण कमी झाले होते. दररोज 100 ते 150 असे रुग्ण आढळून येत होते. मात्र वाढत जाणारी गर्दी, नागरिकांकडून होणार नियमांचे उल्लंघन यामुळे शहरात आत्ता रुग्णसंख्या वाढायला लागली आहे. शहरात मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्या वाढत आहे. एकीकडे राज्यात ओमायक्रॉनचा धोका तर दुसरीकडे दिवसंदिवस वाढत जाणाऱ्या रुग्णसंख्येमुळे चिंतेच वातावरण निर्माण झाला आहे.
पुणे जिल्ह्यात उद्यापासून नो व्हाक्सीन नो एन्ट्री –
राज्यासह पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. आज शहरात तर 1100 कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कडक पाऊले उचलले असून पुणे जिल्ह्यात उद्या पासून ज्या नागरिकांनी कोरोना लसीकरणाचे दोन्ही डोस घेतले नाही, अश्या नागरिकांना शासकीय कार्यालय, हॉटेल्स, उपहारगृहे, बस
अशा ठिकाणी नो व्हाक्सीन नो इन्ट्री असे कडक पाऊल उचलण्यास आले आहेत. अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
जिल्ह्यात 1 ली ते 8 वी पर्यंत शाळा बंद –
वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील 1ली ते 8 वीपर्यंतच्या शाळा हे 31 जानेवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शाळा या ऑनलाईनच्या माध्यमातून घेण्यात येणार आहेत. त्याच बरोबर 9 वी आणि 10 वीच्या शाळा हे सुरू असून या विद्यार्थ्यांना लसीकरण लवकरात लवकर करण्यात येणार आहे, असे देखील यावेळी पवार म्हणाले.
विना मास्क 500 आणि विना मास्क थुकल्यास 1000 रु कारवाई –
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढत असून जिल्ह्यात फक्त 74 टक्के दोन्ही डोस घेतलेले नागरिक असून बाकीच्या लोकांनीही लसीकरण करावं अन्यथा टोकाची भूमिका घ्यायला लावू नका असा इशारा देखील यावेळी पवार यांनी दिला.तसेच नागरिकांची वाढती गर्दी आणि कोरोना नियमांचे पालन केले जात नसल्याने उद्यापासून मास्कची कारवाई ही कडक करण्यात येणार आहे. विना मास्क असलेल्या लोकांवर 500 रुपये तर जे नागरिक विना मास्क असेल आणि थुंकल्यास 1000 रुपये दंड आकारण्यात येणार आहे. अशी माहिती देखील यावेळी पवार यांनी दिली.