राजेंद्र जगताप यांना जिल्हा गुणवंत शिक्षक पुरस्कार
शैक्षणिक उपक्रमांमधील सक्रिय योगदानाबद्दल पुरस्कार

राजेंद्र जगताप यांना जिल्हा गुणवंत शिक्षक पुरस्कार
शैक्षणिक उपक्रमांमधील सक्रिय योगदानाबद्दल पुरस्कार
बारामती वार्तापत्र
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने पुणे जिल्हा गुणवंत शिक्षक पुरस्कार सोहळा मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथे नुकताच पार पडला .
या सोहळ्यात बारामती येथील मएसोचे कै. ग. भि. देशपांडे विद्यालयाचे शिक्षक राजेंद्र जगताप यांना माजी राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य संजय तथा बाळासाहेब भेगडे यांच्या हस्ते जिल्हा गुणवंत शिक्षक पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.
यावेळी विभागीय शिक्षण उपसंचालक डॉ. गणपतराव मोरे , पुणे माध्यमिकचे शिक्षणअधिकारी भाऊसाहेब कारेकर, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे अध्यक्ष निलेश काशिद, शिक्षक परिषदेचे कार्यवाहक महेश शेलार, संतोषजी भेगडे , बारामती शिक्षक परिषदेचे तालुका अध्यक्ष दादासाहेब वनवे , पुरंदर तालुका अध्यक्ष शिवहार लहाने आदी मान्यवर उपस्थित होते .
शिक्षण क्षेत्रातील त्यांचे उल्लेखनीय कार्य, विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी घेतलेले परिश्रम तसेच शैक्षणिक उपक्रमांमधील सक्रिय योगदानाबद्दल पुरस्कार दिले जातात.
या सोहळ्यात पुणे जिल्ह्यातील ऐंशी शिक्षकांना जिल्हा गुणवंत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
जिल्हा गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल मएसो संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे , देशपांडे विद्यालयाच्या शाळा समितीचे अध्यक्ष अजय पुरोहित , प्रशालेचे महामात्र डॉ. गोविंद कुलकर्णी, विद्यालयाचे मुख्याध्यापक धनंजय मेळकुंदे , उपमुख्याध्यापिका सविता हिले, पर्यवेक्षक शेखर जाधव, श्याम नांगरे, बारामती तालुका शिक्षक परिषद कार्यकारणी तसेच शिक्षक, पालक , विद्यार्थी यांनी त्यांचे अभिनंदन केले .