पुन्हा अवकाळी पावसाची ची शक्यता? शेतकरी राजा संकटात
फळबागांचे नुकसान होण्याची शक्यता
बारामती वार्तापत्र
हवामानाचा वाढता बद्दल कधी थंडी तर कधी आभाळ येते आणि पाऊस पडतो त्यामुळे शेतकऱ्यांना नक्की नियोजन करावे कसे हेच समजेनासे झाले आहे. सध्या गव्हाच्या पिकाला थंडीची गरज असताना काल दिवसभर पासून पाऊस पडत आहे. त्यामुळे गव्हावर रोग पडून गव्हाचे उत्पादन घटणार आहे.त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे.
हवामान खात्याने पुढील पाच-सहा दिवस ढगाळ वातावरण व पावसाची शक्यता वर्तविले आहे त्यामुळे शेतकरी अजूनही चिंतेत पडला आहे. अनेक ठिकाणी द्राक्षबागा तयार होण्याच्या मार्गावर आहेत त्यावर डाऊनी, भुरी व इतर बुरशीजन्य रोग पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे केलेला खर्च वाया जाणार आहे.
डाळिंब या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या पिकाचीही हीच अवस्था आहे. धुके ,ढगाळ वातावरण ,पाऊस यामुळे तेल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढणार आहे तसेच इतर छोटी-मोठी तरकारी पिके हीदेखील रोगाला बळी पडणार आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांच्या समोर अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे.
रब्बी पिकांनाही या वातावरणाचा फटका बसणार आहे. कांद्या सारखे महत्त्वाचे पिक शेतकऱ्यांच्या हातून जाणार आहे. अनेक ठिकाणी कांद्याची रोपे लावणीस आली आहेत तर काही ठिकाणी कांदा तयार होऊन महिनाभरात निघणार आहे. त्याच्यामुळे या ही पिकाचे नुकसान होणार आहे.एकंदरीतच या लहरी हवामानाचा फटका शेतकऱ्यांच्या सर्व पिकांना बसणार असल्याने चिंता आणखीनच वाढली आहे.