पुन्हा अॅक्शन मोडमध्ये ‘उद्या महाविकास आघाडीचा नवा घोटाळा उघडकीस आणणार’ किरीट सोमय्या यांचा इशारा
रात्री एक वाजता माझ्यावर गुन्हा दाखल झाला, याला सेटींग म्हणतात.
पुन्हा अॅक्शन मोडमध्ये ‘उद्या महाविकास आघाडीचा नवा घोटाळा उघडकीस आणणार’ किरीट सोमय्या यांचा इशारा
रात्री एक वाजता माझ्यावर गुन्हा दाखल झाला, याला सेटींग म्हणतात.
मुंबई : प्रतिनिधी
उद्या महाविकास आघाडीचा नवा घोटाळा उघडकीस आणणार असल्याचा इशारा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिला आहे. तसेच, मी नॉट रिचेबल का झालो होतो? याचंही उत्तर देणार असल्याचं सोमय्या म्हणाले आहेत.
त्यामुळे आता उद्या किरीट सोमय्या महाविकास आघाडीचा कोणता नवा घोटाळा बाहेर काढतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
यापूर्वी किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीच्या डर्टी डझन नेत्यांची यादी जाहीर केली होती. किरीट सोमय्या यांच्या पाठपुराव्यामुळेच यशवंत जाधव, प्रताप सरनाईक आणि श्रीधर पाटणकर हे अडचणीत आले होते. केंद्रीय तपास यंत्रणांनी या तिघांच्या कोट्यवधींच्या मालमत्तेवर टाच आणली होती. यानंतर पुढचा नंबर हा हसन मुश्रीफ यांचा असेल, असा इशाराही सोमय्या यांनी दिला होता. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्याविषयी नवा खुलासा करण्याचे संकेत सोमय्या यांनी दिले होते. त्यामुळे आता किरीट सोमय्या उद्या ठाकरे सरकारवर कोणता नवा बॉम्ब टाकतात, हे पाहावे लागेल.
किरीट सोमय्यांचा ठाकरे सरकारवर निशाणा
न्यायालयाने हा 58 कोटींचा आकडा आला कुठून अशी विचारणा केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे प्रवक्ता 58 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप करतात, लगेच दुसऱ्या दिवशी गुन्हा दाखल होतो. पण गेल्या दहा दिवसांपासून एकही कागद ते देऊ शकलेले नाहीत. 58 कोटी कुठून आणले याचा एकही पुरावा त्यांच्याकडे नाही, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला.
मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होणार नाही: सोमय्या
किरीट सोमय्या आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा डाव आखल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला होता. मात्र, किरीट सोमय्या यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. मुंबई ही महाराष्ट्रपासून कधीच वेगळी होणार नाही, केंद्रशासित होणार नाही. मुंबईचा आम्हाला अभिमान आहे. ही सगळी शिवसेनेची स्टंटबाजी असल्याचे किरीट सोमय्या यांनी म्हटले.
काय आहे प्रकरण?
माजी सैनिक बबन भोसले यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदारानं दिलेल्या माहितीनुसार, त्यानं दिलेली वर्गणी ही किरीट सोमय्या आणि नील सोमय्याच्या लोकांनी गोळा केली होती. याशिवाय सोशल मीडियावर चर्चगेट, दादर, भांडूप, मुलूंड अशा विविध रेल्वे स्थानकांबाहेर हा निधी गोळा करण्यात आल्याची अनेक छायाचित्र आहेत. अनेक दिवस ही वर्गणी गोळा करण्याचा कार्यक्रम सुरू होता, ज्यात स्टीलच्या एका पेटीत लोकं येताजाता पैसे टाकत होते. यातनं केवळ 11 हजारांच्या आसपास निधी गोळा झाल्याचा जर सोमय्यांचा दावा आहे, तर तो हास्यास्पद आहे. कारण तक्रारदार भोसले यांनीच त्यात दोन हजार रूपये टाकले होते, याशिवाय अन्य काही लोकांनीही हजारांमध्ये देणगी दिलीय. त्यामुळे 11 हजारांची रक्कम तर चर्चगेट स्टेशनबाहेर एका दिवसांत जमा झाले असतील. तसेच तक्रारदार हा माजी सैनिक आहे, तेव्हा त्यांच्या हेतूवर सवाल उठवणंच चुकीच ठरेल. देशावरील, सैन्यावरील प्रेमापोटी लोकांनी हा पैसा दिला होता. त्यामुळे त्याचं नेमकं काय झालं याचा तपास होणं आवश्यक आहे. हा पैसा कुणाच्या खात्यात गेला? त्यातनं काही मालमत्ता विकत घेतलीय का? याची चौकशी करण्यासाठी आरोपींच कस्टडी मिळणं आवश्यक असल्याची भूमिका मुंबई पोलिसांनी घेतली आहे.